90 टक्के तरुणांना 'हा' त्रास होतो सुरू
डॉ. आशीष सिंह यांचं म्हणणं आहे की, जेव्हा आपण वॉशरूममध्ये मोबाइल घेऊन जातो, तेव्हा आपला मेंदू त्या स्क्रीनवर व्यस्त राहतो. त्यामुळे शौचासाठी लागणारा वेळ अधिक वाढतो. याचा परिणाम असा होतो की 90 टक्के तरुणांमध्ये बद्धकोष्ठता आणि पचनतंत्रातील बिघाड दिसून येतो.
मेंदू गुंतल्यामुळे शौचाल वेळ लागतो अन्...
advertisement
जर ही स्थिती दीर्घकाळ टिकली, तर पाइल्स होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. शरीराच्या शौचक्रियेसाठी मेंदू, आतडं आणि स्नायू यांचं एकत्रित काम करणं आवश्यक असतं. पण मोबाइलमध्ये गुंतल्यामुळे मेंदू तितकं लक्ष देत नाही. त्यामुळे आतडं आणि स्नायूंना योग्य वेळी संकेत मिळत नाहीत आणि त्यांना वाट बघावी लागते. यामुळे शौचाला वेळ लागतो, आणि शरीरातील नसांमध्ये रक्त गोळा होऊन पाइल्ससारख्या समस्यांना सुरुवात होते. डॉ. सिंह सांगतात की, पोट नीट साफ न होणं हे याचं प्रमुख लक्षण आहे. त्यासोबतच मरोड, पोट फुगणं, गॅस होणं, अन्न पचत न जाणं अशा तक्रारीही मोठ्या प्रमाणावर वाढतात.
मोबाइलमुळे वाढतो बॅक्टेरियाचा धोका
शौचालयात वापरले जाणारे मोबाइल फोन हे बॅक्टेरियांचे मोठे स्त्रोत ठरू शकतात. अशा फोनमुळे फूड पॉइझनिंग, व्हायरल इन्फेक्शन यांसारख्या गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक असते. 'टर्किश जर्नल ऑफ कोलोरेक्टल डिजीज' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, वॉशरूममध्ये स्मार्टफोन वापरण्याची सवय ही पाइल्स होण्याचं प्रमुख कारण ठरू शकते.
सावधगिरी कशी बाळगावी?
डॉक्टर सांगतात की, वॉशरूममध्ये जाताना मोबाइल फोन नेणं पूर्णपणे टाळावं. पोटासंबंधी त्रास जाणवू लागल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणतीही औषधं स्वतःहून घेऊ नयेत. पालकांनीही आपल्या मुलांच्या सवयींवर आणि मोबाईल वापरावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर, ही सवय फक्त थोड्याशा आरामासाठी केली जाते, पण भविष्यात ती मोठ्या त्रासांचं कारण ठरू शकते. त्यामुळे वेळेत सावध व्हा आणि आरोग्याची काळजी घ्या.
हे ही वाचा : घुबड पाहून घाबरू नका! देवी लक्ष्मीचं आहे वाहन; पण लक्षात ठेवा 'हे' संकेत, अन्यथा होईल होत्याचं नव्हतं
हे ही वाचा : मधमाशी चावली, प्रचंड वेदना होताहेत? घाबरू नका, करा 'हे' घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम!