बेकिंग सोडा केवळ स्वयंपाकातच नाही तर शरीराच्या देखभालीसाठी देखील वापरला जाऊ शकतो. यासाठी बेकिंग सोडा कस वापरायचा याविषयीच्या काही टिप्स त्यांनी व्हिडिओत सांगितल्या आहेत.
पायांसाठी बेकिंग सोड्याचे फायदे - दिवसभर चालण्यानं किंवा उभं राहून पाय थकले असतील तर बेकिंग सोडा हा एक सोपा उपाय असू शकतो. यासाठी, एका टबमध्ये कोमट पाणी भरा आणि त्यात एक चमचा बेकिंग सोडा घाला. नंतर त्यात तुमचे पाय पंधरा-वीस मिनिटं बुडवा. यामुळे, पायांचा थकवा दूर होतो, दुर्गंधी दूर होते आणि त्वचा मऊ होते.
advertisement
Cracked Heels : टाचेच्या भेगांमागे असू शकतं हे कारण, जाणून घ्या कशी घ्यायची काळजी
अॅथलीट फूट म्हणजेच पायांना होणारा बुरशीजन्य संसर्ग. बेकिंग सोडामधले अँटीफंगल गुणधर्म यापासूनही पायांचं रक्षण करतात.
या सर्वांव्यतिरिक्त, जर पाय कोरडे असतील किंवा टाचांना भेगा असतील तर हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. बेकिंग सोडा आणि पाण्यामुळे तुमचे पाय बरे करण्यास मदत होते.
बेकिंग सोडा हा एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे, म्हणजेच तो मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करू शकतो. बेकिंग सोडा, थोड्याशा पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर किंवा शरीरावर हलक्या हातानं मसाज करा. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार होते. किडा चावणं आणि भाजणं यासारख्या त्रासांपासून देखील बेकिंग सोडामुळे आराम मिळतो.
केसांसाठी फायदेशीर - केसांत तेल साचलं असेल तर बेकिंग सोडा मदत करू शकतो. एक चमचा बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळा आणि केसांच्या मुळांना लावा आणि थोड्या वेळानं स्वच्छ धुवा. यामुळे टाळू स्वच्छ होतो आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते.
Ageing : वय होण्याआधीच दिसाल वृद्ध, महिलांनी या सवयी आतापासूनच टाळायल्या हव्या
दात आणि तोंड स्वच्छ करण्यासाठी देखील प्रभावी - बेकिंग सोड्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे दात पांढरे शुभ्र होतात, डाग काढून टाकले जातात आणि श्वास ताजा राहतो. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट किंवा माउथवॉश म्हणून वापरू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवा - बेकिंग सोडा जपून वापरण्याचा सल्ला डॉ. हंसा योगेंद्र यांनी दिला आहे. त्वचा संवेदनशील असेल तर आधी पॅच टेस्ट करायला विसरु नका.
