केस गळणं, पांढरे होणं आणि केस पातळ होणं ही सर्व वयोगटातील लोकांसाठी एक सामान्य समस्या बनली आहे. महागडे शाम्पू, सीरम आणि उपचारांवर पैसे खर्च करतात, पण तरीही त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.
बाह्य उपचारांबरोबरच केसांसाठी महत्त्वाचा आहे आहार. ऋजुता दिवेकर यांनी केसांच्या आरोग्यासाठी शेपूच्या भाजीचं महत्त्व सांगितलं आहे. केसांच्या आरोग्यासाठी, शेपू आहारात समावेश करणं कसं आवश्यक आहे, त्यातले घटक केसांसाठी कसे उपयुक्त आहेत याविषयी त्यांनी या पोस्टमधे माहिती दिली आहे.
advertisement
बऱ्याच ठिकाणी या भाजीला सुवा असंही म्हणतात. शेपू ही भारतीय स्वयंपाकघरातली पारंपरिक भाजी. एकेकाळी महिलांच्या आहारात विशेषतः बाळंतपणानंतर ही भाजी केली जात असे.
Exercises : फिट राहण्यासाठी किती व्यायाम आवश्यक ? किती व्यायाम करणं योग्य ?
ऋजुता यांच्या मते, शेपूमधे फ्लेव्होनॉइड्स, जीवनसत्त्वं आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात. या पोषक घटकांमुळे केस तुटणं कमी होतं तसंच केसांचं नुकसान कमी होतं आणि केस गळती रोखण्यास मदत होते.
शेपूमुळे ताण कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. ताणतणाव आणि कमी झोप ही केस गळणं आणि केस पांढरे होण्याचं प्रमुख कारण असल्यानं, शेपू या समस्या मुळापासून सोडवण्यास मदत करते.
शेपूमुळे थकवा दूर होतो, ऊर्जा वाढते आणि एकूण आरोग्य सुधारतं. शरीर आतून मजबूत असतं तेव्हा त्याचे परिणाम थेट केसांवर दिसून येतात. शेपू नियमित खाल्ल्यानं केस जाड, मजबूत आणि निरोगी होऊ शकतात.
Vitamins Deficiency : हातांची थरथर का होते ? वेळीच व्हा सावध, जाणून घ्या कारणं
शेपूमधले पोषक घटक शरीर योग्यरित्या शोषून घेईल यासाठी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 12 असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. शेपूची भाजी नुसती किंवा दाण्याचं कूट, कांदा घालून किंवा पीठ घालूनही चांगली लागते. तसंच शेपूचा पराठाही बनवू शकता आणि आवळ्याचं लोणचं आणि दह्यासह खाऊ शकता.
आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं आणि दही हा व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे. हे मिश्रण केसांसाठी गेम चेंजर ठरू शकतं. याशिवाय थेपला, पराठा, भज्यांमधे मिसळू शकता किंवा डाळ-भाजीतही थोडेसे घालून चव आणि पोषण दोन्ही वाढवू शकता.
