पुणे: व्हॅलेंटाईन डे मध्ये प्रेमात पडलेल्या सर्वांचीच आपापल्या प्रिय व्यक्तीला स्पेशल गिफ्ट देण्याची तयारी सुरू असते. प्रिय व्यक्तीला काय गिफ्ट द्यायचे त्याच्या अनेक गिफ्ट आयडियाज आपण शोधत असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तीला स्वस्तात अगदी मस्त असे काही छान युनिक आणि क्रियेटिव्ह गिफ्ट कुठे खरेदी करता येतील याची माहिती देणार आहोत.
advertisement
कोण कोणते आहेत गिफ्ट?
पुण्यातील पिंपरीचिंचवड या ठिकाणी एका दुकानात आपल्याला 50 रुपयांपासून ते 2000 रुपये किंमती पर्यंतचे आकर्षक आणि सुंदर शो पीस मिळतील. यात काचेचे, लाकडी हार्ट शेपचे शोपीस मिळतील. पार्टनरसमोर हृदयातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही हे खास मॅसेज लिहलेले शो पीस गिफ्ट म्हणून देऊ शकता. यात तुम्हाला क्रिस्टल, सिल्वर कपल, स्टोन कपल, हर्ट शेप गिफ्ट, फोटो फ्रेम, कपल स्टेच्यू, मेसेज फ्रेम, प्रपोजल स्टेच्यू, रोज स्टेच्यू, क्रिस्टल शॉपीस असे गिफ्ट कमीत कमी म्हणजेच 50 रुपयांपासून पुढील किंमतीत या ठिकाणी तुम्हाला मिळतील.
फक्त 6 हजारांपासून मिळतोय लॅपटॉप, इथं खरेदी केल्यास 30 हजारांची बचत
या गिफ्टवर तुम्ही तुमच्या पार्टनरचे नावदेखील टाकून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला हर्ट शेप गिफ्ट, काचेच्या आकर्षक वस्तू, कपल स्टेच्यू, तसेच तुमच्या प्रिय व्यक्तीला जर कॉफी आवडत असेल. तर कॉफीसाठी पर्सनलाईझ कॉफी कप गिफ्ट करणं ही एक बेस्ट कल्पना असून तुम्ही याठिकाणी पर्सनलाईझ कॉफी मग तयार करून देऊ शकता. पुण्यातील महालक्ष्मी गिफ्टसं या दुकानात या भेटवस्तू अगदी स्वस्त असून आकर्षक देखील आहेत, या तुम्ही तुमच्या प्रियजणांना दिल्या तर ते नक्कीच खुश होतील, असं दुकानदार सुमित यांनी म्हटलंय.
दादरमध्ये मिळतात 100 रुपयांपासून पैठणी पर्स, हे ठिकाण माहितीये का? PHOTOS
तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही या स्वरूपाचे गिफ्ट देऊन तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता आणि तुमचा व्हॅलेंटाईन मस्त करू शकता.





