फक्त 6 हजारांपासून मिळतोय लॅपटॉप, इथं खरेदी केल्यास 30 हजारांची बचत
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महागडा लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी ठाण्यातील 6 हजारांपासून लॅपटॉप देणाऱ्या ठिकाणाला नक्की भेट द्या.
सध्याच्या काळात विद्यार्थी आणि इतर नोकरदारांसाठी लॅपटॉप ही गरजेची गोष्ट बनलीय. ठाण्यातील एका दुकानात अगदी स्वस्तात लॅपटॉप मिळतायेत. प्लॅटफॉर्म नंबर 1 च्या बाहेर पडल्यानंतर पश्चिमेला ‘न्यू लॅपटॉप पार्टस’ नावाचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे. याठिकाणी फक्त 6 हजार रुपयांपासून लॅपटॉप मिळतील.
advertisement
advertisement
advertisement
कोणाला सुरुवातीला कमी बजेटवाला लॅपटॉप आणि तोही वॉरेंटीसहित हवा असेल तर फक्त 6 हजारांत या ठिकाणी लॅपटॉप मिळतोय. सेंकड हँड अॅपलचा टॅबलेटही येथे मिळतात. त्यांची किंमत 7 ते 8 हजारांपासून सुरू होते. तर सॅमसंगच्या टॅबची किंमत 9 हजारांपासून सुरू होते. हे सर्व लॅपटॉप हे ओपन बॉक्स प्रोडक्ट असल्याने ग्राहकांना स्वस्तात मिळतात.
advertisement
advertisement
advertisement
“ओपन बॉक्स प्रोडक्टमध्ये ग्राहकांना 30 ते 40 हजारांचा फायदा होतो. तसेच या लॅपटॉपवर आणि टॅबवर आम्ही जशी त्यांची किंमत असते तशी त्यांच्यावर वॉरंटीही देतो. तसेच काहीही बदल करायचा असल्यास आम्ही तेही करून देतो. त्यामुळे आमच्याकडून घेऊन गेलेल्या प्रोडक्टवर कधीही कोणालाही अडचण आली नाही,” असं दुकानाचे मालक गोपालदास यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कमी बजेटमध्ये लॅपटॉप वॉरेंटीसह घ्यायचा असेल तर नक्कीच ओपन बॉक्स प्रोडक्ट हा चांगला पर्याय आहे. (मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी)