दादरमध्ये मिळतात 100 रुपयांपासून पैठणी पर्स, हे ठिकाण माहितीये का? PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मुलीं आणि महिलांमध्ये ड्रेस किंवा साड्यांइतकीच पर्सचीसुद्धा चर्चा होते. त्यामुळे या पर्सची तुम्हाला 100 रुपयांपासून खरेदी कुठे करता येईल याबद्दच माहिती देणार आहोत.
advertisement
त्याचप्रमाणे स्त्रियांना पर्सही पैठणीला किंवा कोणत्याही भरजरी साडीला साजेसी मिळाली तर केलेला तो श्रृंगार, साज आणखीणचं खुलून दिसतो. कारण पैठणी साड्यांवर मॅचिंग ज्वेलरी मिळते,पण नेमकी साडीला मॅच होणारी पर्स काही मिळत नाही. त्यामुळे दादरमध्ये या पर्सची तुम्हाला 100 रुपयांपासून खरेदी कुठे करता येईल याबद्दच माहिती देणार आहोत.
advertisement
दादर पश्चिम येथील वामन हरी पेठे ज्वेलर्ससमोर असलेल्या ‘राणेज’ मध्ये पर्स आणि क्लचच्या हजारो आणि अनोख्या व्हरायटी पाहायला मिळतात. या पर्समध्ये क्लच, बटवे, मोठ्या पर्स, साइड बॅग असे विविध प्रकार मिळतात. या दुकानात खणाच्या पर्सची 100 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत मिळतात. या पर्समध्ये खणाचे पाऊच, क्लच, ऑफिसबॅग, लहान आणि मध्यम आकारचे पैशांचं पाकीट, तसेच वारली चित्रांच नक्षीकाम असलेली कॉलेज किंवा शाळेची बॅग, असे अनेक प्रकार आहेत.
advertisement
advertisement
नथ असलेल्या पर्सची किंमत 750 रुपये आहे तर नथ नसलेल्या खणाच्या पर्सची किंमत 550 रुपये आहे. या सर्व पर्स आकारानेही मोठ्या आहेत. पैठणीच्या डिझाइनची पण मॅट फिनीश असलेल्या पर्सची किंमत 700 रुपयांपासून सुरु होते. तसेच खणाच्या लहान आकाराच्या क्लचची किंमत 220 तर पैठणीमध्ये असलेल्या लहान आकाराच्या क्लचची किंमत 200 रुपये आहे. त्यामुळे बजेट अगदीच कमी असेल तर हे मिनीबजेट वॉलेटही घेता येतील.
advertisement