पुणे : देशातील बंजारा समाज हा त्यांच्या पारंपरिक कलेसाठी प्रसिद्ध आहे. हा समाज मिळेल ते काम करून आपली उपजीविका साधत असतो. परंतु अस्सल कलाकार तुम्हाला या समाजात पाहायला मिळतील. यांची जीवनशैली ही इतरांपेक्षा फार वेगळी आहे. आपल्या परंपरेला धरून हा समाज वावरत असतो. आज आपण बंजारा समाजात वापरले जाणारे दागिने पाहणार आहोत. जे दागिने बंजारा लोक आपल्या घरी तयार करतात.
advertisement
ओढणीला लावणारे दागिने, केसामध्ये लावणारी बिंदी बॅग तसेच हातात घालायचे कडे या सर्व वस्तू बनवण्यासाठी कमीत कमी तीन दिवस या समाजाला लागतात. याची किंमत 500 रुपये पासून सुरु होते. या दागिन्याची एक नवीन फॅशन देखील निघाली आहे हसली जे गळ्यात घातलं जातं. कुशन कव्हर, पॅच, हातातले छोटे फिंगर, गळ्यात घालायची ज्वेलरी, किचन, ओढणीला लावणारे बटन अशा अनेक वस्तू या बनवल्या जातात. आणि या दागिण्यासाठी खूप जास्त मागणी देखील असते.
उन्हाळ्यात कम्फर्ट सोबतच डॅशिंग लुक हवाय? तो देखील 100 रुपयात? 'हे' पाहाच
रंगीबेरंगी कापड घेऊन त्यावर सुई धाग्याने विणून कापडावर पॅच बनवण्याच काम केलं जातं. तसेच त्या पद्धतीने घागरा देखील बनवला जातो. त्याला डॉलर, कवड्या अशा वेगवेळ्या वस्तू लावून घागरा चोळी दागिने बनवले जातात. प्रामुख्याने हे दागिने राजस्थान गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रामध्ये देखील या समाजाची राहणारी लोक आहेत ती घालताना दिसतात. आज फॅशन म्हणून देखील जे दागिने घेताना दिसतात.