वारंवार लघवी लागणे
रात्री तुम्हाला वारंवार लघवीला जाण्यासाठी उठावे लागत असेल किंवा सकाळी उठल्यावर लगेच लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होत असेल, तर हे रक्तातील साखर वाढल्याचे लक्षण असू शकते.
तीव्र तहान लागणे
सकाळी उठल्यावर खूप तहान लागणे, हे डिहायड्रेशनचे लक्षण आहे, जे वारंवार लघवी झाल्यामुळे होते. हे देखील उच्च साखरेचे एक मोठे लक्षण आहे.
advertisement
खूप थकवा जाणवणे
रात्री पूर्ण झोप झाली असूनही सकाळी उठल्यावर तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटत असेल, तर हे रक्तातील साखरेच्या अनियमित पातळीमुळे असू शकते. कारण, शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही.
अंधुक दिसणे
सकाळी उठल्यावर डोळ्यासमोर काही काळ अंधुक दिसणे, हे देखील मधुमेहाच्या पूर्वस्थितीचे लक्षण असू शकते. उच्च साखर डोळ्यातील लेन्सवर परिणाम करते.
हात-पायांना मुंग्या येणे
सकाळी उठल्यावर हात किंवा पायांमध्ये मुंग्या येणे, बधिर झाल्यासारखे वाटणे, हे मज्जासंस्थेवर होणाऱ्या परिणामांचे संकेत असू शकतात.
वेळीच तपासणी का महत्त्वाची?
ही सर्व लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि 'शुगर लेव्हल'ची तपासणी करून घ्या. प्रीडायबिटीज अवस्थेत योग्य आहार आणि व्यायामाच्या मदतीने मधुमेह टाळता येऊ शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)