TRENDING:

Bold Color Decoration : घर बोल्ड रंगांनी सजवायचंय? 'या' टिप्सच्या मदतीने मिळवा मनासारखा परफेक्ट लूक..

Last Updated:

How to decorate with bold colors : नव्या ट्रेंड्सचा वापर करून तुम्हीही तुमच्या घराला एक स्टायलिश आणि आकर्षक लूक देऊ शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रंगांबद्दल महत्त्वाची माहिती देणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : घराचे इंटीरिअर डिझाइन करताना रंगांची निवड सर्वात महत्त्वाची असते. कारण रंग आपल्या जीवनात आणि घरातही महत्त्वाची भूमिका बजावतात. ते केवळ भिंतींना रंगवतच नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा आणून आपला मूडही प्रभावित करतात. सध्याच्या काळात रंगांसोबतच टेक्सचर्स, मेटॅलिक शेड्स आणि इको-फ्रेंडली वस्तूंनी डिझाइनला एक वेगळी उंची आणि सौंदर्य दिले आहे.
घरासाठी खास इंटीरिअर डिझाइन..
घरासाठी खास इंटीरिअर डिझाइन..
advertisement

या नव्या ट्रेंड्सचा वापर करून तुम्हीही तुमच्या घराला एक स्टायलिश आणि आकर्षक लूक देऊ शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रंगांबद्दल महत्त्वाची माहिती देणार आहोत.

घरासाठी खास इंटीरिअर डिझाइन..

बेडसाठी मरून आणि हिरव्या रंगाच्या बेडशीट्स आणि उशाच्या कव्हरप्रमाणे. जर तुम्हाला तुमच्या लिव्हिंग रूमला चमकदार आणि ठळक लूक द्यायचा असेल, तर सोफ्यावर टॉर्क्वाइज ब्लू, फ्यूशिया आणि पिवळा रंग वापरून पाहा.

advertisement

भिंती आणि मेटॅलिक रंग..

भिंतींवर चमकदार रंगांनी वेगवेगळे टेक्सचर वापरून पाहा किंवा तुम्हाला हवे असल्यास, वेगवेगळ्या रंगांचे पॅटर्न आणि स्टेन सीलिंग देखील तुम्ही बनवू शकता. हे घराच्या भिंतींवर देखील तुमची निवड प्रतिबिंबित करतील.

यातील आणखी एक ट्रेंड म्हणजे धातूचे रंग, जे तुमच्या घरात सौंदर्य वाढवू शकतात. संपूर्ण खोलीत नाही, परंतु तुम्ही छोट्या भिंतीवर, फर्निचरवर किंवा कोणत्याही साध्या सजावटीच्या वस्तूंवर धातूच्या छटा देऊ शकता. सोनेरी, तांबे किंवा सिल्वर असे रंग तुमच्या खोलीला शाही आणि रस्टी लूक देतील.

advertisement

इकोफ्रेंडली आणि फ्यूजन डेकोर..

रंगानंतर नंबर येतो डेकोरचा. हल्ली इकोफ्रेंडली वस्तूंची जास्त मागणी आहे. जसे की, रिसायकल्ड लाकडापासून बनवलेला कॉफी टेबल घराला नैसर्गिक लूक देण्यासोबतच घरातील वातावरण निरोगी ठेवतो. तसेच काच किंवा सिरेमिकऐवजी लाकडी ट्रे खूप सुंदर दिसतो.

पारंपारिक आणि समकालीनच्या गोंधळात सध्या फ्यूजन ट्रेंडमध्ये आहे. लिव्हिंग रूममध्ये कोलोनियल फर्निचरसोबत आधुनिक सोफा ठेवून पाहा किंवा सागवान लाकडी साईड रॅकची सजावट मॉडर्न दिसणाऱ्या फ्लॉवर वाससोबत करा.

advertisement

अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bold Color Decoration : घर बोल्ड रंगांनी सजवायचंय? 'या' टिप्सच्या मदतीने मिळवा मनासारखा परफेक्ट लूक..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल