जाणून घेऊयात रोज अति प्रमाणात कांदा खाण्याचे दुष्परिणाम.
पोटाचे आजार :
कच्च्या कांद्याचं अतिप्रमाणात सेवन केल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला आधीपासूनच पचनाचे विकार किंवा पोटदुखीचा त्रास असेल तर तुम्ही कांद्यापासून दूर राहणं केव्हाही चांगलं. कच्च्या कांद्यामध्ये 'फ्रुक्टेन' नावाचं कार्बोहायड्रेट आढळतं. ज्यामुळे कांदा हा पचायला खूप कठीण जातो. त्यामुळे कांद्याच्या अतिसेवनाने बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, गॅसेस आणि अपचन यांसारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना पोटाचे आजार आहेत त्यांना कांदा खाल्ल्यानंतर पोटफुगीचा त्रास होऊ शकतो.
advertisement
मायग्रेनचा त्रास वाढतो :
जर तुम्हाला मायग्रेनची समस्या असेल तर कच्च्या कांद्याचं सेवन कमी प्रमाणात करणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. कांद्यामध्ये 'टायरामाइन' असतं, ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर तुम्हाला कांद्यापासून 4 हात लांबच रहावं लागेल.याशिवाय तुम्हाला कांदा कितीही आवडत जरी असला तरीही विशेषतः रात्री कांदा खाणं टाळा.
छातीत जळजळीचा त्रास :
जास्त प्रमाणात कच्चा कांदा खाल्ल्याने छातीत जळजळ किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो. कांद्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं. हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र जेव्हा अतिप्रमाणात कांदा खाल्ला जातो तेव्हा त्याचा परिणाम कार्डिओलिव्हरवर होतो. ज्यामुळे छातीत जळजळ होण्याचं प्रमाण वाढू शकतं. याशिवाय कांदा जास्त खाल्ल्याने काही लोकांना ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.
साखरेची पातळी कमी होते :
हाय ब्लडप्रेशर आणि लो ब्लडप्रेशर प्रमाणेच हाय शुगर आणि लो शुगरचा त्रास अनेकांना असतो. रक्तात साखर कमी असण्याच्या स्थितीला 'हायपोग्लायसेमिया' म्हणतात. जास्त प्रमाणात कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी होते. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास अशांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कच्चा कांदा खावा.