TRENDING:

Testicular Torsion Causes : क्रिकेटपटू तिलक वर्माला झालेला 'टेस्टिकुलर टॉर्शन' आजार किती गंभीर? कोणाला होऊ शकतो?

Last Updated:

What Is Testicular Torsion : टीम इंडियाचा युवा स्टार फलंदाज तिलक वर्मा याला सकाळी अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी केली असता त्याला 'टेस्टिकुलर टॉर्शन' झाल्याचे निदान झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील युवा आणि प्रतिभावान फलंदाज तिलक वर्मा यांना अचानक आरोग्याच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. प्राथमिक तपासणीत त्यांना टेस्टिक्युलर टॉर्शन ही गंभीर समस्या झाल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ उपचार झाल्यामुळे त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्यामुळे 'टेस्टिक्युलर टॉर्शन' या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाबद्दल लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.
कोणत्या वयात होऊ शकते ही समस्या
कोणत्या वयात होऊ शकते ही समस्या
advertisement

टेस्टिक्युलर टॉर्शन म्हणजे काय?

टेस्टिक्युलर टॉर्शन ही एक मेडिकल इमरजन्सी मानली जाते. या स्थितीत अंडकोष म्हणजेच टेस्टिकल्स हा त्याला रक्तपुरवठा करणाऱ्या स्पर्मेटिक कॉर्डभोवती वळतो. त्यामुळे अंडकोषात जाणारा रक्तप्रवाह अचानक थांबतो. रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे तीव्र वेदना होतात, अंडकोष सुजतो आणि त्या भागात लालसरपणा दिसू शकतो.

कोणत्या वयात होऊ शकते ही समस्या

advertisement

ही समस्या कोणत्याही वयात उद्भवू शकते. मात्र ती 12 ते 18 वर्षांच्या किशोरवयीन मुलांमध्ये अधिक आढळते. अनेकदा खेळताना, झोपेत किंवा कोणतीही स्पष्ट कारणे नसतानाही टेस्टिक्युलर टॉर्शन होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष केल्यास अंडकोषाला कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका असतो.

यावर उपचार काय?

- टेस्टिक्युलर टॉर्शनमध्ये वेळ अत्यंत महत्त्वाची असते. डॉक्टरांच्या मते, 6 ते 12 तासांच्या आत शस्त्रक्रिया न झाल्यास अंडकोष वाचवणे कठीण होते आणि काही प्रकरणांमध्ये तो काढून टाकण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे तिलक वर्मा यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली.

advertisement

- या शस्त्रक्रियेमध्ये अंडकोष योग्य स्थितीत परत आणून त्याला स्थिर केले जाते, जेणेकरून भविष्यात पुन्हा अशी समस्या उद्भवू नये. वेळेत उपचार होणे महत्त्वाचे.

- शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी साधारणतः 2 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरुवातीच्या एक-दोन आठवड्यांत पूर्ण विश्रांती घेणे आणि जड हालचाली टाळणे आवश्यक असते. टाके 2 ते 3 आठवड्यांत आपोआप विरघळतात.

advertisement

- सामान्य दैनंदिन कामे 1 ते 2 आठवड्यांत सुरू करता येतात, मात्र जड व्यायाम, खेळ किंवा शारीरिक संबंधांसाठी 4 ते 6 आठवडे प्रतीक्षा करणे योग्य ठरते. योग्य काळजी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुनर्वसन केल्यास रुग्ण पूर्णपणे निरोगी आयुष्य जगू शकतो.

तिलक वर्मा यांच्या या घटनेमुळे तरुणांमध्ये टेस्टिक्युलर टॉर्शनबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. अचानक अंडकोषात तीव्र वेदना, सूज किंवा अस्वस्थता जाणवल्यास विलंब न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणेच जीव वाचवू शकते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Testicular Torsion Causes : क्रिकेटपटू तिलक वर्माला झालेला 'टेस्टिकुलर टॉर्शन' आजार किती गंभीर? कोणाला होऊ शकतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल