आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी सांगितली मोलाची गोष्ट
आपत्ती व्यवस्थापन आणि सिव्हिल डिफेन्स एक्सपर्ट डॉ. एम. पी. सिंग यांनी सांगितलं की, सिलेंडरला आग लागल्यास सर्वात आधी घाबरून जायचं नाही. ते म्हणाले की, अनेकदा लोक सुरुवातीच्या ठिणगीकडे दुर्लक्ष करतात, किंवा भीतीमुळे वेळीच प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत, ज्यामुळे अपघात मोठं रूप घेतो.
डॉ. सिंग यांनी सांगितलं की, आगीचा संपर्क हवेसोबत आल्यावर ती अधिक पसरते. त्यामुळे वेळीच तिला ओल्या कपड्याने किंवा मातीने झाकून हवेपासून वेगळं करणं गरजेचं आहे. त्यांनी असाही इशारा दिला की, "कोरड्या कपड्याचा वापर कधीही करू नका, तो जळून आग अधिक वाढवू शकतो."
advertisement
किचनमध्ये सुरक्षिततेचे 'हे' नियम कधीही विसरू नका
- किचनमध्ये काचेची भांडी, सहज पेट घेणारे पदार्थ किंवा रॉकेल तेल कधीही ठेवू नका.
- सैल कपडे घालणं टाळा.
- गरम भांडं उचलण्यापूर्वी त्याची स्थिती तपासा.
- फोडणी देताना विशेष काळजी घ्या, कारण तेलाची आग खूप वेगाने पसरते.
हे ही वाचा : Health Tips : आहारात आवर्जुन खा 'हे' फळ, हृदय, डोळे आणि हाडांसाठी अत्यंत गुणकारी!
हे ही वाचा : नदीतील मासे तुम्हाला बनवतील फिट; नियमित खा 'हे' मासे, BP अन् हार्ट अटॅकवर रामबाण उपाय!