TRENDING:

Raisin Health Benefits: काळा, पिवळा, हिरवा की लाल? आरोग्यासाठी कोणता मनुका फायदेशीर

Last Updated:

Health benefits of raisins in Marathi: बेदाण्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर आणि अँटिऑक्सिडेंट असतात जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. बाजारात सध्या 4 प्रकारचे आणि 4 रंगांचे मनुके उपलब्ध आहेत. हिरवा, पिवळा, लाल आणि काळा, जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या मनुक्यात कोणते गुणधर्म आहेत आणि कोणता मनुका खाणं आरोग्यासाठी जास्त फायद्याचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जर तुम्हाला फिट राहून आजारांना दूर पळवायचं असेल तर सकस आणि पौष्टिक आहार घेण्याची गरज आहे. मात्र सध्या जंक फूडचं प्रमाण इतकं वाढलंय की त्यातून पोषक तत्वे मिळण्याचं प्रमाण नगण्य झालंय. अशावेळी जर आपल्याला औषधं न घेता फिट राहायचं असेल तर सुकामेवा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सुकामेव्यातल्या विविध घटकांपैकी एक घटक म्हणजे मनुका किंवा बेदाणे. बेदाण्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर आणि अँटिऑक्सिडेंट असतात जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात. बाजारात सध्या 4 प्रकारचे आणि 4 रंगांचे मनुके उपलब्ध आहेत. हिरवा, पिवळा, लाल आणि काळा.
प्रतिकात्मक फोटो : आरोग्यासाठी कोणता मनुका फायद्याचा हिरवा,लाल, पिवळा की काळा
प्रतिकात्मक फोटो : आरोग्यासाठी कोणता मनुका फायद्याचा हिरवा,लाल, पिवळा की काळा
advertisement

जाणून घेऊयात कोणत्या रंगाच्या मनुक्यात कोणते गुणधर्म आहेत आणि कोणता मनुका खाणं आरोग्यासाठी जास्त फायद्याचं आहे.

हे सुद्धा वाचा : Raisins Benefits : हिवाळ्यात मनुके खाण्याचे फायदे अनेक, दात-घसा-मधुमेहसारखे आजार होतात बरे

बेदाणे कसे तयार करतात?

अनेकांना माहिती असेल की बेदाणे किंवा मनुके हे द्राक्षांपासून तयार केले जातात.द्राक्षांना योग्य त्या प्रमाणात सुकवून हे मनुके तयार होतात. द्राक्ष सुकवून मनुके जरी तयार केले तरीही त्यांच्या पौष्टिक गुणधर्मांमध्ये कमतरता येत नाही.

advertisement

हिरवा मनुका

हिरवे मनुके हे हिरव्या द्राक्षांपासून तयार करतात. द्राक्षांच्या लांबी आणि जाडीवरून मनुक्यांचा आकार आणि चव बदलू शकते. हिरव्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह,अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. या पोषक तत्वांमुळे  शरीराला ऊर्जा तर मिळतेच, मात्र मानसिक आरोग्यातही सुधारणा होते.

advertisement

पिवळा मनुका

पिवळा किंवा सोनेरी रंगाप्रमाणे दिसणारा मनुका हा चवीला गोड असतो. त्यामुळे विविध खाद्यपदार्थांमध्ये या मनुक्यांचा वापर जास्त होतो. विविध प्रकारच्या द्राक्षांपासून हे मनुके तयार केले जाते. पिवळ्या मनुक्यांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पिवळे मनुके गोड असल्याने त्यात नैसर्गिक साखरचं प्रमाण अधिक असतं. मात्र असं असलं तरीही यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. पचनक्रिया सुधारण्यासाठीही  पिवळे मनुके फायद्याचे आहेत.

advertisement

लाल मनुका

लाल द्राक्षापासून लाल मनुके तयार होतात. जशी लाल द्राक्षांची चव ही आंबट गोड असते तशीच लाल मनुक्यांचीही चव बदलत जाते. लाल मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात. लाल मनुक्यातल्या लोहामुळे रक्त शुद्ध व्हायला आणि वाढायला मदत होते तर व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. लाल बेदाणा हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो.

advertisement

हे सुद्धा वाचा : Women Health : महिलांसाठी कोणते मनुके जास्त फायदेशीर, पिवळे की काळे? तज्ज्ञांनी सांगितले 5 फायदे

काळा मनुका

काळ्या द्राक्षांपासून तयार केलेला मनुका अशी काळ्या मनुक्यांची ओळख सांगता येईल. काळ्या मनुक्यांची चवही आंबट गोड असते. मात्र काळ्या मनुका हा लाल मनुक्यांपेक्षा जास्त फायदेशीर मानला जातो, कारण या लोहाचं प्रमाण अधिक असतं म्हणून त्यांच्या रंगही काळा होतो. काळ्या मनुक्यांमुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच. मात्र रक्तदाबही नियंत्रित व्हायला मदत होते. काळ्या मनुकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जगभरातल्या लोकप्रिय मनुक्यापैकी काळा मनुका हा अधिक लोकप्रिय आहे.

कोणते मनुके आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत?

प्रतिकात्मक फोटो : आरोग्यासाठी कोणता मनुका फायद्याचा हिरवा,लाल, पिवळा की काळा

आपण पाहिलं की प्रत्येक रंगाच्या मनुक्यांमध्ये आरोग्यदायी गुणधर्म आहेत. मनुक्यांच्या रंगामुळे त्यांच्या पोषक तत्वांमध्ये सुद्धा बदल दिसून येतात. जसं हिरव्या रंगाच्या मनुक्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पिवळ्या मनुक्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहते. लाल मनुके हृदयासाठी फायद्याचे आहेत तर काळ्या मनुक्यांमुळे ॲनिमियासारखा आजार दूर व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मनुका निवडू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Raisin Health Benefits: काळा, पिवळा, हिरवा की लाल? आरोग्यासाठी कोणता मनुका फायदेशीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल