शरीराची ही कामं पूर्ण झालीत नाही तर त्याचे परिणाम शरीरावर आणि मनावर होतात. कारण अपुरी झोप मंद विषासारखं काम करते. याचे तात्काळ परिणाम एकाग्रता कमी होणं, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं, मूड स्विंग होणं आणि प्रतिक्रियेचा वेळ कमी होणं या स्वरूपात दिसून येतात.
अपुऱ्या झोपेमुळे, अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि हार्मोनल संतुलन बिघडतं. यामुळे भविष्यात अल्झायमर, डिमेंशिया आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो.
advertisement
Heart Disease : हृदयाच्या काळजीसाठी महत्त्वाच्या टिप्स, हे व्यायाम आवर्जून करा
सतत सहा तासांपेक्षा कमी झोपेमुळे हृदय आणि मेंदूचे धोके वाढतात. त्यामुळे प्रत्येकानं सात ते आठ तासांची झोप घेतली पाहिजे, जेणेकरून मेंदू पूर्ण क्षमतेनं कार्य करू शकेल आणि चयापचय संतुलित राहील.
कमी झोपल्यानं उत्पादकता वाढते असे काही जण मानतात, पण हे चुकीचं आहे. झोप हे शरीराचं रिसेट बटण आहे.
कमी झोपेमुळे मेंदूतल्या विषारी पदार्थांचा योग्य पद्धतीनं निचरा होत नाही.
स्मरणशक्ती - अपुऱ्या झोपेमुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर परिणाम होतो. विचार आणि निर्णय घेण्यावर परिणाम जाणवतो. स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता यामुळे कमकुवत होते.
Hair Fall : हिवाळ्यात केस का गळतात ? केस गळती रोखण्यासाठी काय करावं ?
हृदयविकाराचा धोका: कमी झोपणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
मूड स्विंग्स आणि ताण: सेरोटोनिन आणि डोपामाइनच पातळी विस्कळीत होते, ज्यामुळे चिंता आणि नैराश्य वाढतं.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती - कमी सायटोकिन्स तयार होतात, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
