TRENDING:

Toddler Tantrums : मुलं चिडचिड-हट्ट का करतात? बालरोगतज्ञांनी सांगितले खरे कारण आणि उपाय..

Last Updated:

How To Handle Toddler Tantrums : ज्येष्ठ सल्लागार बालरोगतज्ञ डॉ. दीपा अग्रवाल यांचे मत आहे की, मुलांच्या रागाला किंवा हट्टीपणाला समजून घेणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा पालक त्यांच्या या भावना समजून घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्यावर ओरतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अनेकदा पालक लहान मुलांच्या वागण्याला 'खोडकर, हट्टी किंवा रागीट' म्हणून दुर्लक्ष करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, मुलांचे असे वागणे त्यांची चूक नसून, त्यांच्या भावनिक वेदनेचे संकेत असू शकतात. ज्येष्ठ सल्लागार बालरोगतज्ञ डॉ. दीपा अग्रवाल यांचे मत आहे की, मुलांच्या रागाला किंवा हट्टीपणाला समजून घेणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा पालक त्यांच्या या भावना समजून घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्यावर ओरतात.
मुलं चिडचिड किंवा हट्ट का करतात?
मुलं चिडचिड किंवा हट्ट का करतात?
advertisement

डॉ. दीपा यांच्या मते, 'अनेकदा मुले आईवर हात उगारतात, पण ही खरोखरच मुलाची चूक आहे का? की आपण काहीतरी अधिक खोलवर पाहण्यात किंवा आपल्या मुलांना समजून घेण्यात कमी पडत आहोत?' चला जाणून घेऊया मुलांच्या वागण्यातील बदलांची कारणे.

मुलं चिडचिड किंवा हट्ट का करतात?

जेव्हा एखादे मूल मारामारी करते, चावा घेते किंवा जमिनीवर लोळून रडते, तेव्हा त्याला लगेच 'बदमाष' किंवा 'असभ्य' म्हटले जाते. पण प्रत्यक्षात हे त्यांच्या आतल्या अस्वस्थतेची, भूक, भीती यांसारख्या नकारात्मक भावनांची अभिव्यक्ती असू शकते, ज्या ते शब्दांतून व्यक्त करू शकत नाहीत.

advertisement

यामागचे वैज्ञानिक कारण काय?

तज्ञांचे म्हणणे आहे की, लहान मुलांचा मेंदू, विशेषतः त्यांचा फ्रंटल कॉर्टेक्स, जो विचार करण्यास आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार असतो, तो अजून पूर्णपणे विकसित झालेले नाही आणि विकासाच्या प्रक्रियेत आहे. ही प्रक्रिया साधारणपणे 5 वर्षांपर्यंत सुरू असते. म्हणूनच ते त्यांच्या मोठ्या भावनांना शब्दांत व्यक्त करू शकत नाहीत आणि जेव्हा परिस्थिती त्यांच्या नियंत्रणात नसते, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया मारामारी करणे, रडणे किंवा ओरडणे अशी होते.

advertisement

आपले त्यांच्यासोबतचे वर्तन कसे असावे?

जर मुल असे वागत असेल तर ही वेळ आहे की, आपण मुलांच्या वागण्याला फक्त शिस्तीच्या दृष्टिकोनातून पाहू नये. मुलांच्या अशा वागण्यामागील लपलेले भावनिक संकेत समजून घ्यावे. उदाहरणार्थ, पुढच्या वेळी जेव्हा तुमचे मूल चिडेल किंवा हट्टीपणा करेल, तेव्हा स्वतःला विचारा, 'त्याला आता माझ्या मदतीची गरज आहे की फक्त ओरडण्याची?'

advertisement

'माइंडफुल पेरेंटिंग' का आवश्यक आहे?

हे माइंडफुल पेरेंटिंगच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे मुलाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. त्याचबरोबर पालक आणि मुलाच्या नात्यालाही अधिक मजबूत करते. जर तुम्हीही मुलांच्या वागण्याबद्दल गोंधळलेले असाल, तर या लेखाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Toddler Tantrums : मुलं चिडचिड-हट्ट का करतात? बालरोगतज्ञांनी सांगितले खरे कारण आणि उपाय..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल