चांगल्या आरोग्याचे लक्षण
प्राचीन काळी मुलींच्या लांब केसांवर खूप जोर दिला जात होता. ते सौंदर्याइतकंच आरोग्याशीही संबंधित होतं. लांब आणि घट्ट केस बहुतेकदा चांगल्या आरोग्याचं प्रतीक मानलं जातं. अनेक अभ्यासांमध्ये असं म्हटलं आहे की, लांब केस पुरुषांसाठी आरोग्य आणि प्रजननक्षमतेचं लक्षण असू शकतात. ऐतिहासिकदृष्ट्या, महिलांचे निरोगी आणि सुंदर केस प्रजनन क्षमता, चांगले पोषण आणि आरोग्यदायी जीवनशैलीशी जोडलेले आहेत. याशिवाय, महिलांच्या शरीरात इस्ट्रोजन हार्मोनची पातळी जास्त असल्यामुळे केस लांब आणि घट्ट होतात. त्यामुळे पुरुष नैसर्गिकरित्या त्याकडे आकर्षित होतात.
advertisement
सौंदर्याचं प्रतीक
अनेक संस्कृतींमध्ये लांब केस सौंदर्य आणि स्त्रीत्वाचं प्रतीक मानलं गेलं आहे. भारतीय संस्कृतीबद्दल बोलायचं झाल्यास, इथेही लांब केस पारंपरिक सौंदर्याचा एक भाग मानले जातात. चित्रपट, पुस्तकं आणि कलेत लांब केस असलेल्या स्त्रिया अनेकदा आदर्श आणि आकर्षक म्हणून दाखवल्या जातात. अशा परिस्थितीत, या सगळ्याचा पुरुषांच्या विचारांवरही खोलवर परिणाम होतो. याशिवाय, लांब केस बहुतेकदा "स्त्रीत्व" आणि "कोमलपणा" यांच्याशी जोडलेले असतात आणि पुरुष या कोमलपणा आणि सौंदर्याकडे आकर्षित होतात, असा एक सामान्य समज आहे.
मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात?
लांब केस बहुतेकदा लैंगिक आकर्षणाचं लक्षण म्हणून पाहिलं जातं. उदाहरणार्थ, लांब केस फिरवणं किंवा वापरणं ही फ्लर्ट करण्याची एक लोकप्रिय पद्धत आहे. महिलांचे केस पुरुषांना नकळत आकर्षित करतात कारण ते पारंपरिक लैंगिक संकेत म्हणून पाहिले जातात. तसेच, लांब केस पुरुषांसाठी मानसिकदृष्ट्या आकर्षक गुण बनतात. कारण त्यांचं लक्ष सहजपणे लांब आणि सुंदर केसांकडे आकर्षित होऊ शकतं.
संशोधन काय म्हणतं?
काही संशोधनांमध्ये असं आढळून आलं आहे की, पुरुष अनेकदा लांब केस असलेल्या महिलांकडे आकर्षित होतात. 2004 मधील एका अभ्यासात असं म्हटलं होतं की, लांब केस असलेल्या महिला पुरुषांना अधिक आकर्षक आणि तरुण वाटतात. हे अध्ययन सूचित करतं की, लांब केस एक नैसर्गिक आणि आकर्षक लुक देतात, जो तारुण्य आणि प्रजननक्षमतेचं प्रदर्शन करतो. पुरुषांचं लांब केसांकडे आकर्षण अनेक जैविक, सांस्कृतिक, मानसिक आणि सामाजिक कारणांमुळे असतं. हे केवळ शारीरिक आकर्षणाची बाब नाही, तर लांब केस समाजात आणि संस्कृतीत जो संदेश आणि प्रतिमा पाठवतात, त्याच्याशीही ते खूप संबंधित आहे. अर्थात, हे आकर्षण प्रत्येक पुरुषासाठी वेगळं असू शकतं.
हे ही वाचा : तुम्हालाही हवेत लांबसडक, घनदाट केस? आजपासूनच खायला सुरुवात करा 'हा' पदार्थ!
हे ही वाचा : Pomegranate : आरोग्यासाठी उपयुक्त फळ - डाळिंब, अशक्तपणा होईल दूर, तब्येत राहिल तंदुरुस्त