तुम्हालाही हवेत लांबसडक, घनदाट केस? आजपासूनच खायला सुरुवात करा 'हा' पदार्थ!

Last Updated:

केस म्हणजे सौंदर्याचा एक भाग, ते सुदृढ असतील तर सौंदर्यात आणखी भर पडते. त्यामुळे आपले केस छान राहावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. परंतु आजकाल केसगळती ही अगदी सामान्य समस्या झाली आहे.

सुंदर केसांसाठी सोपा उपाय
सुंदर केसांसाठी सोपा उपाय
सौरभ वर्मा, प्रतिनिधी
रायबरेली : महिला असो किंवा पुरुष, घनदाट केस कोणाला नाही आवडत. असं म्हणतात की, आपण जे काही खातो, त्याचाच परिणाम आपल्या त्वचेवर, केसांवर होतो. केस म्हणजे सौंदर्याचा एक भाग, ते सुदृढ असतील तर सौंदर्यात आणखी भर पडते. त्यामुळे आपले केस छान राहावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. परंतु आजकाल केसगळती ही अगदी सामान्य समस्या झाली आहे. काही केल्या केस गळायचे थांबत नाहीत आणि नवे केस उगवण्याबाबत तर काहीच खात्री नसते. त्यामुळे टक्कल होण्याबाबत अनेकजण चिंतेत असतात.
advertisement
डॉ. स्मिता श्रीवास्तव सांगतात की, आपल्यालाही लांबसडक, काळेभोर, घनदाट केस हवे असतील तर आपण दररोज आवळा खायला हवा. आवळा म्हणजे सुपरफूड. ज्यामुळे आरोग्य सुदृढ राहतंच, शिवाय सौंदर्यही वाढतं. कारण त्यात भरपूर पोषक तत्त्व असतात. आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही कमालीची वाढते. आयुर्वेदात आवळ्याला अतिशय गुणकारी मानलं जातं. कारण आवळा केसांसह संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरतो.
advertisement
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आवळा व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असतो. त्यामुळे स्कॅल्पमध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत मिळते. परिणामी केसांची वाढही व्यवस्थित होते. आवळ्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्मही असतात. तसंच व्हिटॅमिन सीसह ए, बी व्हिटॅमिन्सदेखील असतात. फॉस्फरस, कॅल्शियम, फायबर आणि कार्बोहायड्रेट तत्त्वांनी आवळा परिपूर्ण असतो.
आवळा आपण फळ म्हणून खाऊ शकता किंवा त्याची पावडर बनवूनही सेवन करू शकता. त्याचबरोबर आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा आवळ्याचं लोणचंदेखील खाऊ शकता. कोणत्याही पद्धतीनं खाल्ला तरी आवळा केसवाढीसाठी फायदेशीर ठरतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
तुम्हालाही हवेत लांबसडक, घनदाट केस? आजपासूनच खायला सुरुवात करा 'हा' पदार्थ!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement