Amla : आवळ्याचे आरोग्यकारक फायदे वाचा, लगेचच करा आहारात समावेश

Last Updated:

चवीबरोबरच आवळ्यात आरोग्यवर्धक गुणधर्म असतात, त्यामुळे आवळ्याचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा.

आवळा त्वचेसाठी खूप चांगला मानला जातो.
आवळा त्वचेसाठी खूप चांगला मानला जातो.
मुंबई : आवळ्याची चव बहुतेकांना आवडते. आवळ्याला सुपरफूड म्हटलं जातं. आवळा हिवाळ्यात अवश्य खावा.
नुसता खाण्याबरोबरच आवळ्याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात चारप्रकारे करु शकता.
आवळा चवीबरोबरच आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो. आवळ्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश केला जाऊ शकतो. आवळा हा आयुर्वेदात औषध म्हणून वापरला जातो. आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानला आहे. आवळ्यामध्ये केवळ व्हिटॅमिन सी नाही तर व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, कार्बोहायड्रेट आणि फायबरसारखे अनेक गुणधर्म असतात.
advertisement
आवळा खाण्याचे फायदे -
आवळा रोज खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म दृष्टी सुधारण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी फायदेशीर आहेत. आवळ्याचं सेवन कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं आणि ते खाल्ल्यानं संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
असा करा आवळ्याचा आहारात समावेश -
advertisement
1. आवळ्याचं लोणचं -
लोणचं हा भारतीय खाद्यपदार्थाचा महत्त्वाचा भाग आहे. आवळा तुम्ही तुमच्या आहारात लोणच्याच्या स्वरूपात समाविष्ट करु शकता. चवीबरोबरच आरोग्यासाठीही आवळा खूप फायदेशीर आहे.
२. आवळ्याचा मुरांबा किंवा जाम -
तुम्हाला आंबट पदार्थासोबत गोड पदार्थ आवडत असतील तर तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता. आवळ्याचा मुरांबा किंवा जाम हा त्याच्यासाठी चांगला पर्याय आहे.
advertisement
३. आवळा चटणी-
आवळा चटणी जेवणाची चव तर वाढवतेच पण शरीराला अनेक फायदे मिळवून देण्यासही मदत करते.
४. आवळा रस-
आवळ्याचा रस रोज सकाळी प्यायला तर शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. हा रस पिण्याबाबत आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Amla : आवळ्याचे आरोग्यकारक फायदे वाचा, लगेचच करा आहारात समावेश
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement