Cardamom - रोज रात्री वेलची खा, तोंडाच्या दुर्गंधीवर आहे रामबाण उपाय
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
चवीबरोबरच वेलची तब्येतीसाठीही महत्त्वाची आहे. मौखिक आरोग्य, वजन व्यवस्थापन, निद्रानाश अशा अनेक बाबतीत वेलचीचा उपयोग होतो.
मुंबई : भारतीय मसाले नेहमीच त्यांच्या खास चवीसाठी ओळखले जातात. या मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ते आपल्या तंदुरुस्तीसाठीही आवश्यक आहेत.
आज आपण वेलचीबद्दल माहिती घेऊयात. छोटी हिरवी वेलची साधारणपणे स्वयंपाकात वापरली जाते. घरी काही गोड बनवलं जातं किंवा एखादी भाजी, यात वेलची घातली की, त्याची चव आणि सुगंधामुळे जेवणाची रंगत वाढते. चवीबरोबरच हा मसाला आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
वेलचीचे आरोग्यकारक फायदे :
रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाणं तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतं..
advertisement
निद्रानाश
आजच्या काळात अनेकदा काहींना कामाच्या दबावासोबतच अनेक प्रकारच्या तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे रात्री शांत झोप येत नाही. योग्य झोप न मिळाल्यानं तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
तुम्हालाही निद्रानाशाची समस्या असेल तर वेलची खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलच्या चावून खा आणि कोमट पाणी प्या.
advertisement
वजन कमी होतं
हिरव्या वेलचीचं सेवन वजन कमी करण्यातही खूप फायदेशीर ठरू शकतं. रात्री झोपण्यापूर्वी हिरव्या वेलचीचं सेवन केलं तर शरीरात जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते.
मौखिक आरोग्य
मौखिक आरोग्यासाठीही वेलची खूप फायदेशीर मानली जाते. श्वासात दुर्गंधी आल्यावर लोक अनेकदा वेलची खातात. मात्र यामुळे काही काळ आराम मिळत असला तरी तो कायमस्वरूपी उपाय नाही. श्वासाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी दोन वेलची नीट चावून खा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या.
advertisement
रक्तदाब नियंत्रण, हृदयाचं आरोग्य, यकृताचं आरोग्य, वजन व्यवस्थापन, श्वसन, मधुमेह नियंत्रणासाठी वेलची उपयुक्त आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2024 5:11 PM IST