TRENDING:

First Love : पहिलं प्रेम विसरणं इतकं कठीण का असतं? सायन्स काय सांगतं?

Last Updated:

Why its hard to forget our first love : काही कारणामुळे ते नातं पुढे नेता आलं नाही तर ते तुटतं आणि त्यामुळे मन दुखवलं जातं. ज्याचा कधीकधी खूप मानसिक त्रास होतो. त्यावेळी अनेकांना आयुष्य नकोसं वाटतं किंवा काहीच करण्याची इच्छा होत नाही. या हार्टब्रेकमधून बाहेर यायला लोकांना खूप वेळ लागतो. पण असं का होतं? कधी असा प्रश्न पडलाय?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पहिलं प्रेम म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातच्या पुस्तकातलं एक वेगळं आणि अविस्मरणीय पान असतं. त्यामुळे ते विसरणं जवळ-जवळ प्रत्येकासाठी अशक्य असतं. काही कारणामुळे ते नातं पुढे नेता आलं नाही तर ते तुटतं आणि त्यामुळे मन दुखवलं जातं. ज्याचा कधीकधी खूप मानसिक त्रास होतो. त्यावेळी अनेकांना आयुष्य नकोसं वाटतं किंवा काहीच करण्याची इच्छा होत नाही. या हार्टब्रेकमधून बाहेर यायला लोकांना खूप वेळ लागतो. पण असं का होतं? कधी असा प्रश्न पडलाय?
first Love
first Love
advertisement

पहिलं प्रेम विसरता येत नाही, याचं उत्तर केवळ भावनांमध्ये नाही, तर विज्ञानातही दडलं आहे. आता हे कसं शक्य आणि प्रेमाचा सायन्सशी काय संबंध असं नक्कीच वाटलं असेल. मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स सांगतात की पहिल्या प्रेमाच्या काळात आपल्या मेंदूत ‘डोपामिन’, ‘ऑक्सिटोसिन’ आणि ‘सेरोटोनिन’ सारखी हार्मोन्स मोठ्या प्रमाणात स्रवतात. हेच रसायन मेंदूला आनंद, उत्साह आणि आकर्षणाची अनुभूती देतात. म्हणूनच त्या आठवणी मेंदूच्या ‘रिवॉर्ड सिस्टीम’मध्ये कोरल्या जातात.

advertisement

Harvard Medical School च्या लेखात देखील याबद्दल लिहिलं गेलं आहे. त्यात लिहिल्या प्रमाणे, ‘प्रेमामध्ये मेंदूचा रिवॉर्ड सिस्टीम सक्रिय होतो; त्यात डोपामीनची भूमिका असते, तसेच ऑक्सिटोसिन आणि व्हॅसप्रेसिन या हार्मोन्सदेखील जोडलेले असतात.’

एवढच नाही तर 'Imaging the Passionate Stage of Romantic Love' मध्ये PET स्कॅन वापरून, पहिल्या प्रेमाचा अनुभव घेणाऱ्या लोकांमध्ये मेंदूमध्ये डोपामीनची वाढ होते हे आढळले आहे.

advertisement

पहिल्या प्रेमाच्या काळात मेंदू नवनवीन अनुभवांसाठी अत्यंत संवेदनशील असतो, सगळ्या गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा होत असतात, त्यामुळे त्या नवीन असतात आणि आठवणीत नेहमी रहातात. जशी कोणतीही गोष्ट आपण आयुष्यात पहिल्यांदा केली तर आपल्या ती लक्षात रहाते. जसे की पहिला फोन, पहिली फ्लाईट, पहिला विदेशी प्रवास, पहिली गाडी, पहिलं घर, पहिला जॉब. या सगळ्याच गोष्टी आयुष्यात नेहमी लक्षात रहातात. तसंच प्रेमाच्या बाबतीत पण होतं.

advertisement

विशेषतः किशोरवयात. त्यामुळे पहिलं प्रेम ही केवळ भावना नसून एक जैविक प्रक्रिया असते, जिचं स्मरणशक्तीवर खोल ठसा उमटतो. मानसशास्त्रज्ञ सांगतात की पहिलं प्रेम ‘पहिला भावनिक ठसा’ (emotional imprint) निर्माण करतं. त्यामुळे पुढची प्रेमसंबंध येऊन गेले तरी, त्याची पहिल्या अनुभवाशी तुलना होत राहते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

तसंच, ‘नॉस्टॅल्जिया’ म्हणजेच भूतकाळाच्या आठवणींमुळे येणारा आनंदही या आठवणींना जिवंत ठेवतो. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो किंवा त्या काळातील जागा पाहतो, तेव्हा मेंदू पुन्हा त्या रासायनिक प्रतिक्रिया निर्माण करतो, जशा पहिल्या प्रेमात झाल्या होत्या. थोडक्यात सांगायचं तर, पहिलं प्रेम विसरणं कठीण असतं कारण ते केवळ मनाचं नव्हे तर मेंदूच्या रसायनशास्त्राचं आणि आपल्या ओळखीचा भाग बनलेलं असतं. म्हणूनच पहिलं प्रेम, त्याचं नाव जरी घेतलं तरी, मनात एक हळवा आणि गोड कंपन निर्माण करतं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
First Love : पहिलं प्रेम विसरणं इतकं कठीण का असतं? सायन्स काय सांगतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल