हिवाळ्याच्या कोरड्या हवेत केसांची चांगली काळजी घेण्यासाठी हेअर मास्क उपयुक्त ठरतात. दही आणि लिंबू मास्क, कडुनिंब आणि आवळा मास्क, अॅपल सायडर व्हिनेगर आणि मध मास्क या मास्कमुळे केस चांगले राहतात.
दही आणि लिंबू मास्क - दह्यातील लॅक्टिक अॅसिड आणि प्रोबायोटिक्स टाळूच्या पीएच पातळीला संतुलित करतात, तर लिंबाचे अँटी-फंगल गुणधर्म डोक्यातील कोंडा नियंत्रित करतात.
advertisement
Resolution : नवीन वर्षाचा संकल्प केला का ? संकल्प करण्यासाठी या टिप्स फायदेशीर
हा मास्क बनवण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस तीन चमचे ताजं दही मिसळा. टाळू आणि केसांना व्यवस्थित लावा आणि तीस मिनिटं तसंच राहू द्या. नंतर सौम्य शाम्पूनं केस धुवा. आठवड्यातून दोनदा हे वापरल्यानं कोंडा कमी होईल आणि केसांवर नैसर्गिक चमक देखील मिळेल.
कडुनिंब आणि आवळा मास्क - कडुनिंबातल्या बॅक्टेरिया वाढीला प्रतिबंध करणाऱ्या गुणधर्मांमुळे केसांचं आरोग्य सुधारतं. आवळ्यामुळे टाळूला पोषण मिळतं आणि मुळांपासून कोंडा काढून टाकण शक्य होतं. हा मास्क बनवण्यासाठी कडुनिंबाच्या ताज्या पानांची बारीक पेस्ट बनवा. या मिश्रणात दोन चमचे आवळा पावडर आणि थोडं गुलाबाचं पाणी घाला. ही पेस्ट टाळूला लावा आणि चाळीस मिनिटांनी धुवा. या मास्कमुळे खाज सुटणं आणि कोरडेपणापासून त्वरित कमी होतो.
अॅपल सायडर व्हिनेगर आणि मध मास्क - अॅपल सायडर व्हिनेगरमधील अॅसिटिक अॅसिड टाळूच्या मृत पेशी आणि अतिरिक्त तेल काढून टाकतं, तर मधाचा उपयोग नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून होतो. दोन चमचे कच्चं अॅपल सायडर व्हिनेगर आणि एक चमचा मध मिसळा. थेट टाळूला लावा आणि वीस मिनिटांनी थंड पाण्यानं धुवा. हा मास्क टाळूच्या छिद्रांना साफ करून डोक्यातील कोंडा कमी करण्यास मदत करतो.
Iron Deficiency : पुरुषांपेक्षा महिलांमधे Iron Deficiency जास्त का? वाचा सविस्तर
केळी आणि ऑलिव्ह ऑइल मास्क - केळ्यातली भरपूर जीवनसत्त्वं आणि खनिजं टाळूसाठी उपयुक्त ठरतात. ऑलिव्ह ऑइलमधील ओलिओकॅन्थल जळजळ आणि खाज कमी करते. एक पिकलेलं केळ कुस्करा आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल घाला. हे मिश्रण केसांना आणि टाळूला लावा आणि पाऊण तास तसंच राहू द्या. कोरडे आणि कोंडा असलेले केस असलेल्यांसाठी हा मास्क विशेषतः फायदेशीर आहे.
