एक महिन्याच्या लग्नात दीड महिन्यांची प्रेग्नंट असलेल्या या महिलेचं प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. या महिलेमध्ये काही दिवसांपासून प्रेग्नन्सीची लक्षणं दिसत होती. म्हणून ती टेस्ट करण्यासाठी डॉक्टरांकडे केली. डॉक्टरांनी तिची टेस्ट केली, रिपोर्ट दिला तो पाहून तिला धक्काच बसला. डॉक्टरंनी तिला सांगितलं की दीड महिन्याची प्रेग्नंट आहे. पण तिचं लग्न 30 दिवसांपूर्वीच झालं, लग्नाच्या रात्री तिने पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवले, मग हे कसं काय झालं? ती महिलाही घाबरली.
advertisement
पण तिची टेस्ट करणाऱ्या डॉक्टरांनीच तिला हे कसं शक्य झालं ते सांगितलं. त्यांनी यामागील सायन्स समजावलं. प्रेग्नन्सीची डेट कशी मोजली जाते हे डॉक्टरांनी समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की, गर्भधारणेचं वय गर्भधारणेच्या दिवसापासून मोजलं जात नाही, कारण गर्भधारणेची नेमकी तारीख निश्चित करणं कठीण असते. त्यामुळे तो महिलेच्या शेवटच्या मासिक पाळीच्या (LMP) पहिल्या दिवसापासून मोजलं जातो. याला गर्भधारणेचं वय म्हणतात. कारण ओव्हुलेशन आणि गर्भधारणा सामान्यतः शेवटच्या मासिक पाळीच्या सुमारे दोन आठवड्यांनंतर होतं.
म्हणून जर अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भ दीड महिन्याचा असल्याचं दिसून आलं तर याचा अर्थ ती स्त्री दीड महिन्यापूर्वी प्रेग्नंट झाली असं नाही. तर तिला तिच्या शेवटच्या मासिक पाळीला दीड महिने झाले असा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर ही महिला लग्नाच्या रात्री किंवा लग्नानंतर तिच्या पतीसोबत पहिल्यांदाच लैंगिक संबंध ठेवत असताना गर्भवती राहिली.
Pregnancy : प्रेग्नंट होण्यासाठी किती वेळा शारीरिक संंबंध ठेवावे लागतात, कितीदा ट्राय करावं?
ज्या डॉक्टरांकडे ही महिला गेली होती त्यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे. @drshobha.fc इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
