TRENDING:

Women Health : तिशीच्या टप्प्यावर या चाचण्या नक्की करा, आरोग्याबद्दल सजग राहा, जागतिक महिला दिनानिमित्तानं स्वत:ला द्या भेट

Last Updated:

विशेषतः महिला तीस वर्षांची झाल्यानंतर तिच्या शरीरात महत्त्वाचे हार्मोनल बदल सुरू होतात. या वयात महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. वेळेवर वैद्यकीय तपासणी केल्यानं गंभीर आजाराचं निदान लवकर होण्यास मदत होते आणि त्यांच्यावर उपचार करणं सोपं होतं. तीस वर्षांच्या वयानंतर प्रत्येक महिलेनं कोणत्या चाचण्या निश्चितपणे कराव्यात समजून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिन जवळ आलाय. या निमित्तानं महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाची माहिती.
News18
News18
advertisement

आठ मार्च हा दिवस आपल्याला महिलांच्या हक्कांची, समाजातील त्यांच्या योगदानाची आणि त्यांच्या आरोग्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. समाजातील महिला सतत कुटुंब आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमधे व्यस्त असतात. अनेकदा, या धावपळीत, त्या त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत.

विशेषतः महिला तीस वर्षांची झाल्यानंतर तिच्या शरीरात महत्त्वाचे हार्मोनल बदल सुरू होतात. या वयात महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. वेळेवर वैद्यकीय तपासणी केल्यानं गंभीर आजाराचं निदान लवकर होण्यास मदत होते आणि त्यांच्यावर उपचार करणं सोपं होतं. तीस वर्षांच्या वयानंतर प्रत्येक महिलेनं कोणत्या चाचण्या निश्चितपणे कराव्यात समजून घेऊयात.

advertisement

Obesity : लहानपणचा लठ्ठपणा भविष्यात ठरु शकतो धोकादायक, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी - गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमधे होणाऱ्या सर्वात धोकादायक कर्करोगांपैकी एक आहे. WHO नुसार, 2022 मधे अंदाजे 6,60,000 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि 3,50,000 महिलांचा या आजारानं मृत्यू झाला. म्हणून, तीस वर्षांच्या वयानंतर, प्रत्येक महिलेनं दर तीन वर्षांनी एकदा पॅप स्मीअर चाचणी करून घ्यावी. कधीकधी HPV चाचणीची देखील शिफारस केली जाते. या चाचण्या गर्भाशयाच्या मुखाच्या पेशींमधे काही बदल झालेत का याचा शोध घेतला जातो आणि कर्करोगाचा धोका कमी करणं शक्य होतं.

advertisement

स्तनाच्या कर्करोगाची तपासणी - जगभरातील महिलांमधे स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. WHO नुसार, 2022 मधे स्तनाच्या कर्करोगानं अंदाजे 6,70,000 महिलांचा मृत्यू झाला. स्तनाच्या कर्करोगावर सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करणं सोपं आहे. म्हणूनच, महिलांनी वयाच्या तिशीपासून त्यांच्या स्तनांची स्वतः तपासणी करण्याची सवय लावली पाहिजे जेणेकरून कोणत्याही गाठी, सूज किंवा वेदना लगेच लक्षात येतील. चाळीस वर्षांनंतर नियमित मॅमोग्राम करणं देखील आवश्यक आहे, विशेषतः जर कुटुंबात स्तनाच्या कर्करोगाचा इतिहास असेल तर ही चाचणी नक्की करा.

advertisement

रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल चाचण्या - जीवनशैलीतले बदल, ताणतणाव आणि आहार यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलची सुरुवात लवकर होते. कुटुंबात कोणाला मधुमेह असेल तर या चाचण्या अवश्य करुन घ्या.यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक सारखे गंभीर आजार लवकर ओळखण्यास मदत होऊ शकते.

Inadequate sleep : झोप म्हणजे शरीराची ढाल, संरक्षणाविना शरीराचं होतं नुकसान

advertisement

थायरॉईड - हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्या सामान्य आहेत. याचा मासिक पाळीवर परिणाम होतो आणि अकाली रजोनिवृत्तीचा धोका वाढू शकतो. वजन अचानक वाढणं किंवा कमी होणं, सतत थकवा येणं, केस गळणं किंवा मूड स्विंग जाणवत असेल तर थायरॉईड फंक्शन चाचणी करणं महत्वाचं आहे. नियमित तपासणी दरम्यान थायरॉईडची तपासणी केल्यानं या समस्या लवकर टाळता येतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
7 वी पास अर्जदाराला मिळणार 35 टक्के शासकीय अनुदान, व्यवसायासाठी 'ही' आहे अट!
सर्व पहा

हाडांची चाचणी - पस्तीस वर्षांनंतर महिलांच्या हाडांची ताकद हळूहळू कमी होते. शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता असल्यानं हाडं कमकुवत होतात. हाडांच्या bone density चाचणीमुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका आहे का ते कळतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Women Health : तिशीच्या टप्प्यावर या चाचण्या नक्की करा, आरोग्याबद्दल सजग राहा, जागतिक महिला दिनानिमित्तानं स्वत:ला द्या भेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल