TRENDING:

7 वी पास अर्जदाराला मिळणार 35 टक्के शासकीय अनुदान, व्यवसायासाठी 'ही' आहे अट!

Last Updated:

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा आणि रोजगारनिर्मिती वाढावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा आणि रोजगारनिर्मिती वाढावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना बँकेमार्फत कर्ज दिले जाते आणि त्यावर शासनाकडून अनुदानही मिळते. उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) उद्योगासाठी 50 लाख रुपयांपर्यंत तर सेवा क्षेत्रातील व्यवसायासाठी 20 लाख रुपयांपर्यंत प्रकल्प मंजूर केला जाऊ शकतो. या प्रकल्प खर्चावर जास्तीत जास्त 35 टक्के शासकीय अनुदान मिळत असल्याने तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी मदत मिळते.
advertisement

या योजनेचा लाभ सुशिक्षित बेरोजगार तरुण, महिला तसेच स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणारे ग्रामीण व शहरी भागातील नागरिक घेऊ शकतात. या योजनेमुळे बँकेकडून कर्ज मिळणे सोपे होते आणि शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे व्यवसाय सुरू करताना लागणारा खर्च कमी होतो. त्यामुळे अनेक तरुण लहान-मोठे उद्योग, दुकाने किंवा सेवा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होत आहेत.

advertisement

Health Tips : अशक्तपणा अन् ताप, अजिबात करू नका दुर्लक्ष, असू शकतो गंभीर आजाराचा धोका

या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय साधारणपणे 18 ते 45 वर्षे असावे आणि किमान 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने याआधी शासनाच्या अशा प्रकारच्या अनुदानित योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्ज करताना आधार कार्ड, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, प्रकल्पाचा आराखडा (प्रोजेक्ट रिपोर्ट), बँक खात्याची माहिती आणि पासपोर्ट साईज फोटो अशी कागदपत्रे आवश्यक असतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

या योजनेसाठी अर्ज जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने करता येतो. अर्ज मंजूर झाल्यानंतर बँकेमार्फत कर्ज दिले जाते आणि उद्योग सुरू झाल्यानंतर शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची चांगली संधी उपलब्ध होत असून राज्यात रोजगारनिर्मितीला देखील चालना मिळत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
7 वी पास अर्जदाराला मिळणार 35 टक्के शासकीय अनुदान, व्यवसायासाठी 'ही' आहे अट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल