दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेगवेगळ्या थीम ठेवण्यात येतात. 2025 च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ‘प्लास्टिक प्रदूषण संपवा’ अशी आहे. ही थीम सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी करणे, अशी आहे. यासाठी #beatplasticpollution या हॅश टॅगसह या मोहिमेचा प्रचार केला जात आहे.
advertisement
जागतिक पर्यावरण दिनी हे करा
यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण काय करू शकतो? असा प्रश्न अनेकांना असेल. तर झाडे लावणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, ऊर्जेची बचत करणे, पाण्याचा योग्य वापर करणे, पर्यावरण पूर्वक सवय लावून घेणे व इतरांना पर्यावरणाबद्दल प्रोत्साहित करू शकतो. या काही छोट्या गोष्टी करून आपण पर्यावरण दिन साजरा करू शकतो.
दरम्यान, जागतिक पर्यावरण दिन आपल्याला आपली पृथ्वी हे आपले घर आहे आणि तिचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, याची आठवण करून देतो.





