उन्हाळा आणि पावसाळ्यात डासांचा त्रास वाढतो. डास चावल्यानं खाज येणं, जळजळ होणं हा त्रास होतोच पण डासांमुळे जीवघेणे आजारही होतात. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही उपाय केले तर उपद्रव कमी होऊन आजार रोखले जाऊ शकतात. या उपायांमधे कोणत्याही रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही.
Acidity : अॅसिडिटीनं होणाऱ्या पोटदुखीवर औषध, डॉक्टरांनी सुचवलेत पाच घरगुती उपाय
advertisement
कडुनिंब आणि खोबरेल तेलाचं मिश्रण
कडुनिंबाचं तेल हे डासांना दूर करण्यासाठीचं नैसर्गिक औषध आहे. नारळाच्या तेलात मिसळून हे तेल शरीरावर लावलं तर डास पळून जातात. यासाठी दहा थेंब कडुनिंबाचं तेल, एक चमचा नारळ तेलात मिसळा आणि हात, पाय आणि उघड्या भागांवर लावा.
लिंबू - लवंग
डासांना लिंबू आणि लवंग दोन्हीचा वास आवडत नाही. हा उपाय डासांना खोलीपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी आहे. एका लिंबाचे दोन तुकडे करा, प्रत्येक तुकड्यात चार - पाच लवंगा चिकटवा. खोलीच्या कोपऱ्यात ठेवा.
कापूर
कापुराचा वास डासांना दूर ठेवण्यास मदत करतो. हा उपाय प्राचीन काळापासून वापरला जात आहे. घरात कापूर जाळूनही डासांना दूर ठेवता येतं. रात्री झोपण्यापूर्वी खोलीत एका भांड्यात कापूर लावा. दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा जेणेकरून त्याचा परिणाम टिकून राहील.
Walnuts : अक्रोडाचा अतिरेक ठरेल नुकसानकारक, वाचा ब्रेन फूड अक्रोड जास्त खाण्याचे तोटे
तुळशीचं रोप
तुळशीच्या सुगंधानं डास दूर पळतात आणि वातावरणही शुद्ध राहतं. तुळशीचं रोप खिडकी किंवा दाराजवळ ठेवा.
लसूण पाणी शिंपडा
डासांना लसणाचा तिखट वास अजिबात आवडत नाही. लसणाचं पाणी खोलीत फवारू शकता. यामुळे डासही दूर होतात. यासाठी लसणाच्या दोन-तीन पाकळ्या बारीक करा. एक कप पाण्यात उकळवा. थंड झाल्यावर ते बाटलीत भरा आणि खोलीत फवारणी करा.
