देशात स्ट्रोकच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. इंडियन स्ट्रोक असोसिएशनच्या मते, भारतात दरवर्षी अंदाजे 1.8 दशलक्ष जणांना स्ट्रोकचा त्रास होतो, ज्यात तरुणांची संख्या वाढत आहे. वेळेवर खबरदारी घेतली आणि योग्य जीवनशैली स्वीकारली तर या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.
रक्ताच्या गुठळ्यामुळे किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे, काही कारणास्तव रक्तपुरवठा खंडित होतो.
advertisement
या परिस्थितीत, मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मरायला लागतात आणि रुग्णाच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
Hair Conditioner : केस दिसतील मुलायम, कंडिशनर बनवण्यासाठी या टिप्स वापरा
स्ट्रोक कशामुळे होऊ शकतो त्यामागची संभाव्य कारणं पाहूयात -
उच्च रक्तदाब - डॉक्टरांच्या मते, साठ टक्के स्ट्रोक रुग्णांमधे, उच्च रक्तदाब हे स्ट्रोकचं मुख्य कारण आहे. सतत उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील नसा कमकुवत होतात. ज्यामुळे रक्तवाहिन्या फुटण्याचा धोका वाढतो. यासाठी, रक्तदाब नियमितपणे तपासा आणि वेळेवर औषधं घ्या.
मधुमेह - रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यानं रक्तवाहिन्या सुजण्याचा आणि ब्लॉकेज होण्याचा धोका वाढतो. मधुमेह असलेल्यांना सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत स्ट्रोकचा धोका दुप्पट असतो. यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
धूम्रपान आणि मद्यपान - तंबाखू आणि धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. धूम्रपानामुळे स्ट्रोकचा धोका पन्नास टक्क्यांनी वाढतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जास्त मद्यपान केल्यानं मेंदूतील रक्तस्रावाचा धोका देखील वाढतो.
Intestines : पचनव्यवस्था चांगली राखण्यासाठी या टिप्स ठरतील उपयुक्त, नक्की वाचा
लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव - जास्त वजन, अयोग्य आहार आणि कमी शारीरिक हालचालींमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो. यामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्टरॉल होऊ शकतो, ज्यामुळे स्ट्रोक होऊ शकतो. म्हणून, दररोज किमान तीस मिनिटं व्यायाम करा.
उच्च कोलेस्ट्रॉल - रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) चं प्रमाण वाढल्यानं रक्तवाहिन्यांमधे प्लेक तयार होऊ शकते, ज्यामुळे रक्तप्रवाह रोखू शकतो. हे टाळण्यासाठी फास्ट फूड, तळलेले पदार्थ आणि ट्रान्स फॅटपासून दूर राहावं.
स्ट्रोकसाठी सुरुवातीची लक्षणं ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
चेहरा वाकणं - एका हातात किंवा पायात अचानक कमजोरी येणं, स्पष्टपणे बोलता येत नाही. अशा वेळी, 'गोल्डन अवर' मधे ताबडतोब रुग्णालयात जाणं गरजेचं आहे. वेळेवर उपचार केल्यानं रुग्णाचे प्राण वाचू शकतात आणि नंतर अपंगत्व येण्याचा धोका कमी होऊ शकतो.
घरचं खाणं, ताणतणाव व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणी, जीवनशैलीतल्या या छोट्या बदलांमुळे स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.
