आकर्षक घागरा चोळी 200 रुपयांपासून
अंबा स्टोअर्सचे मालक निमिश दमानी यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले की, अमरावतीमधील अंबादेवी मंदिर परिसरात आमचे अंबा स्टोअर्स या नावाने दुकान आहे. आमच्याकडे सर्वच सणासुदीचे ट्रेंडिंग कपडे मिळतात. विशेष म्हणजे सर्व कपडे आम्ही स्वतः बनवतो. त्यानंतर त्याची होलसेल दरात विक्री करतो. सध्या नवरात्री सुरू आहे. त्या अनुषंगाने आता महिलांसाठी घागरा चोळी आहे. अगदी 6 महिन्यांच्या बाळापासून त्यात लागेल त्या साईजमध्ये सर्वच कलर उपलब्ध आहेत.
advertisement
लहान मुलांसाठी 200 रुपयांपासून ते 700 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. फुल साईज असणारी ब्रँडेड घागरा चोळी 1 हजार रुपयांपासून ते 6 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. त्यासोबत लागणारी सर्वच प्रकारची ज्वेलरी देखील उपलब्ध आहे. ब्लॅक मेटल, व्हाइट मेटल आणि कवड्यांची ज्वेलरी 100 रुपयांपासून उपलब्ध आहे.
पुरुषांसाठीही ड्रेस उपलब्ध
तसेच पुरुषांसाठी लागणारे सर्वच प्रकारचे दांडियासाठी लागणारे ड्रेसेस उपलब्ध आहेत. त्यातही अगदी छोट्या बाळापासून ते फुल साईज पर्यंत सर्वच कलर उपलब्ध आहेत. त्यात 200 रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत सुंदर सुंदर कपडे उपलब्ध आहेत. तसेच 15 प्रकारच्या दांडिया स्टिक देखील उपलब्ध आहे. त्यासुद्धा 50 रुपयांपासून आमच्या दुकानामध्ये उपलब्ध आहेत.
ओटीसाठी लागणारे पातळ आणि सोहळे अगदी स्वस्त दरात
नवरात्रीमध्ये महिला देवीची ओटी भरतात. त्यात देवीसाठी साडी, पातळ, खण, सोहळे देवीला अर्पण करतात. ते सर्व साहित्य अगदी 100 रुपयांपासून उपलब्ध आहे. तसेच व्यवसाय करण्यासाठी देखील अगदी होलसेल दरात आम्ही विक्री करतो. आमच्या दुकानाचा पत्ता अंबादेवी परिसरात अंबा स्टोअर्स, अशी माहिती त्यांनी दिली.