पुण्यातील तुळशीबाग मार्केट म्हणजे एक शॉपिंग हब. ही एक पुण्याची जुनी बाजारपेठ आहे. या मार्केटमध्ये अगदी छोट्या छोट्या वस्तू पासून ते महिला आणि पुरुषांच्या कपड्यांपर्यंत होलसेल दुकानं इथे तुम्हाला बघायला मिळतील. तुळशीबाग मार्केटमध्ये कुर्तींची अशी बरंचशी होलसेल दुकाने पाहायला मिळतील जिथे फक्त 200 रुपयांपासून कुर्ती तुम्ही खरेदी करू शकता. या दुकानांपैकीच एक साक्षी ड्रेसेस शॉप हे एक आहे. या ठिकाणी कॉटन, खादी, सिल्क, चिकनकारी अनेक प्रकारच्या कुर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतील.
advertisement
सिल्क, कॉटन फॅब्रिक फुल, शॉट, स्लीव्हलेस असे वेगवेगळे 20 हून अधिक प्रकारची कुर्ती ही असून 200 रुपयांपासून कुर्ती मिळते. यामध्ये एक्सएल, डबल एक्सएल, ट्रिपल एक्सएल असे वेगवेगळ्या साईझमध्ये कुर्ती उपलब्ध आहेत. अतिशय आकर्षक असणारी ही कुर्तीची डिझाईन देखील पाहायला मिळते. कमी किंमतीत हे कुर्ती पाहायला मिळतात, अशी माहिती व्यवसायिक अहेमद अन्सारी यांनी दिली.