पुणे : सध्या मार्च महिन्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे प्रत्येक जण उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी काळजी घेत आहे. कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून घराबाहेर पडताना सनग्लास घालून आपण बाहेर पडतो. त्यामुळे डॅशिंग लुकसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सनग्लासेस पुण्यात अवघ्या 100 रुपयात कुठे मिळतील याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
advertisement
कुठे कराल खरेदी?
पुण्यातील कॅम्प परिसरात अवघ्या 100 रुपयात तुम्हांला वेगवेगळे सनग्लासेस मिळतील. यात लेडीज सनग्लासेसच्या असंख्य व्हरायटी असून जेन्स सनग्लासेसच्या देखील अगदी असंख्य व्हरायटी आहेत. स्वस्तात मस्त हे सनग्लासेस तुम्हाला तुमचे स्टाईल स्टेटमेंट उंचावण्यासाठी देखील मदत करेल. यामध्ये व्हाईट फ्रेन, गांधी गॉगल, शाईन गॉगल, महिलांच्या गॉगल्समध्ये ब्लॅक रेज गॉगल तर लहान मुलांच्या गॉगलमध्ये अगदी साधे आणि रंगीबेरंगी गॉगल तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. हे गॉगल कमी किमतीतले जरी असले तरीही उन्हापासून ते तुमच्या डोळ्यांचं संरक्षण करू शकतात, असं गॉगल विक्रेते यांनी सांगितलं आहे.
उन्हाळ्यात गॉगल का घालावा?
डोळे सुरक्षित राहतील. उन्हाळ्यात सनग्लासेस लावणे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. सनग्लासेस तुमच्या डोळ्यांना सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून वाचवण्याचे काम करतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, खाज आणि सूज यासारख्या समस्या होत नाहीत आणि डोळे निरोगी राहतात. डोळ्यांच्या चांगल्या संरक्षणासाठी, मोठ्या चष्म्यांसह चष्मा निवडणे चांगले आहे, जेणेकरून तुमचे डोळे पूर्णपणे झाकले जातील आणि त्यांच्यावर सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी होईल.