TRENDING:

एकापेक्षा एक उपयोगी गुणधर्म असणारी घोंगडी; खरेदी करा फक्त 350 रुपयांपासून 

Last Updated:

आजकाल पुन्हा एकदा घोंगड्याचा वापर हा वाढू लागला आहे. हातमागवर विणलेली किंवा मशीन वर बनवलेली अशी अनेक प्रकारची घोंगडी बाजारात उपलब्ध असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : थंडीच्या दिवसात उबदार पांघरून घेऊन झोपी जायला बऱ्याच जणांना आवडते अशातच सर्वात उबदार अशा पांघरूणामध्ये घोंगड्याचा समावेश होतो. आजकाल पुन्हा एकदा घोंगड्याचा वापर हा वाढू लागला आहे. हातमागवर विणलेली किंवा मशीन वर बनवलेली अशी अनेक प्रकारची घोंगडी बाजारात उपलब्ध असतात. कोल्हापुरातही पट्टणकोडोली आदमापूर अशा ठिकाणी हे घोंगडी ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. याच ठिकाणी ही घोंगडी बनवली जात असल्यामुळे बाहेरच्या विविध भागातून त्यांना मागणी आहे.

advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असणाऱ्या आदमापूर येथे श्री बाळूमामा देवस्थान मंदिरामुळे अनेक भक्तांची मांदियाळी असते. संत बाळूमामा यांच्या खांद्यावर नेहमीच घोंगडे पाहायला मिळते. त्यामुळेच इथे दर्शनाला येणाऱ्या भक्तांमध्येही घोंगडी विकत घेण्याची उत्सुकता लागून राहिलेली असते. याच परिसरात घोंगडी विक्री करणाऱ्या शीला शहाजी सनगर या महिलेने घोंगड्यांच्या किंमतीबद्दल माहिती दिली आहे.

advertisement

लग्न असो किंवा सण, साडीवर मॅचिंग पैठणी पर्स हवीच; मुंबईत 'या' मार्केटमध्ये फक्त 100 रुपयांपासून करा खरेदी

शीला सनगर या गेली पंधरा वर्षांपासून घोंगडी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. तर गेली सात ते आठ वर्षांपासून आदमापुर मंदिर परिसरात त्यांचे घोंगडी विक्रीचे दुकान आहे. शीला यांच्या घरात स्वतः हाताने बनवून ही घोंगडी विकली जात होती. मात्र आधुनिकीकरणामुळे मशीनवर बनणाऱ्या घोंगड्यांना मागणी अधिक असल्यामुळे त्यांनी सध्या अशी घोंगडी बनवण्याचे काम बंद केले असल्याचे शीला यांनी सांगितले आहे.

advertisement

घोंगडी ही एक देवाला अर्पण करण्यासाठी आणि दुसरी म्हणजे स्वतःला वापरण्यासाठी अशा दोन प्रकारची असतात. त्या घोंगड्यांना दोन दोरी, सव्वा दोरी, तीन दोरी अशा प्रकारे ओळख असते. तर कोल्हापूर परीसरात कोकप्नूर, तुंग संकेश्वरी, कुदरगी बुद्याळ, चळकेरी, मडेलरी वाणके, नातपोत, जमखंडी, अथणी मुरगुंडी आदी घोंगड्यांचे प्रकार विक्रीसाठी उपलब्ध असतात, असेही शीला यांनी सांगितले.

advertisement

नवजात बाळापासून ते 20 वर्षापर्यंतच्या मुलींचे परकर पोलके; सुंदर कलेक्शनची करा एकाच ठिकाणी खरेदी Video

काय काय आहेत किंमती?

शीला संघर यांच्या दुकानात मशीनवरील काळी घोंगडी 350 रुपयांपासून ते 700 रुपयांपर्यंत, दगडी रंगाची मशीनवरील घोंगडी 800 रुपये, पांढरे लोकर मिक्स असणारे मशीनवरील 1200 रुपये, हातमागावर विणलेली ओरिजनल घोंगडी 1500 रुपयांपासून पुढे, कंबर दुखी, पाठदुखी, मणकादुखी कमी करण्यासाठी 900 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंत जेन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर दुकानात जमिनीवर बसण्यासाठी बस्तर 150 रुपये, धार्मिक कार्यावेळी बसण्यासाठी बस्तर, फोटोपुजा, मुर्तीपुजा करण्यासाठी कापड, लहान मुलांना दृष्ट लागू नये यासाठी हातात बांधायला दोरे हे देखील उपलब्ध आहेत. 

का असतात हातमागावर विणलेली घोंगडी महाग?

हल्ली हातमागावर घोंगडी क्वचितच लोक विणतात. यामध्ये बकऱ्यापासून जी लोकर काढलेली असते, त्याच सुताची ओरिजनल घोंगडी हातमागावर बनवली जातात. तर मशीनवर बनणाऱ्या घोंगडी मध्ये 80 टक्के लोकर तर वीस टक्के इतर मिसळ वापरलेली असते. त्यामुळेच हातमागावर विनलेज्या घोंगड्यांचे दर तुलनेत जास्त असतात, अशी माहिती देखील शीला सनगर यांनी दिली आहे.

नॉनव्हेज प्रेमी आहात? मग ही संधी सोडूच नका; इथं चक्क मिळतीय अंडा आणि चिकन कुल्फी

दरम्यान घोंगडी ही हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देतात. त्याचबरबर पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखी, निद्रानाश, उच्च रक्तदाब, मधुमेह, कांजण्या, गोवर, ताप अशा अनेक आजार आणि समस्यांवर घोंगडीचा वापर गुणकारी ठरतो. त्यामुळेच हल्ली ग्राहकांकडून घोंगडीची मागणी देखील वाढताना दिसत आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
एकापेक्षा एक उपयोगी गुणधर्म असणारी घोंगडी; खरेदी करा फक्त 350 रुपयांपासून 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल