पुणे : पुण्यातील पेठामध्ये अनेक होलसेल मार्केट्स आहेत. जिथून तुम्ही ज्वेलरी, कॉस्मेटिक आणि कपडे खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे पुण्यातील रविवार पेठ इथे असलेल्या मार्केटमध्ये होलसेलच्या दरामध्ये घरगुती बिझनेससाठी कुर्तीज, पॅन्ट, कॉडसेट खरेदी करता येईल. कमी जागेत आणि कमी खर्चात स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर हे मार्केट खरेदीसाठी बेस्ट पर्याय आहे.
advertisement
होलसेल दरात खरेदी करा कुर्तीज
पुण्यातील रविवार पेठ इथे असलेल्या अक्षय कलेक्शन या दुकानात होलसेल कुर्तीज ड्रेस मटेरियल मिळतात. ज्याची खरेदी तुम्ही अगदी 500 रुपयांपासून करू शकतात. असंख्य प्रकारच्या कुर्तीज इथे मिळतात.
ना चोरीचं टेन्शन ना महागाईची चिंता, फक्त 50 रुपयांपासून खरेदी करा आकर्षक दागिने, Video
कोण कोणते आहेत प्रकार?
गेली 20 वर्ष झालं आम्ही होलसेल कुर्ती विक्रीचा व्यवसाय करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्राभर याची विक्री होते. सगळ्या प्रकारच्या कुर्तीज इथे आहेत. कुर्ती पॅन्ट, कॉड सेट, दुपट्टा सेट, थ्री पीस आणि टू पीस घेरा पॅन्ट असे असंख्य प्रकार इथे पाहिला मिळतात. याची किंमत ही 500 रुपयांपासून सुरुवात होते.
तब्बल 7 लाखांचा पेन, विशेषता पाहून तुम्हीही व्हाल अवाक, PHOTOS
या कुर्तीज घेऊन घरगुती बिझनेस, शॉप देखील सुरु करू शकतो. यामध्ये घेरा, फॅब्रिक, कॉटनचे कुर्तीस आहेत. एमएल, एक्स एल, डबल एक्सएल आणि थ्री एक्सएलमध्ये चार सेट मिळातात. आलिया कट, चंदेरी वूमन सिल्क, कोडं सेट, विचित्रा सिल्क, हॅन्ड वर्क कुर्ती, ऑरगॅनझा, चिकनकारी असे वेगवेगळे प्रकार आहेत तर हजार पेक्षा जास्त डिझाईन इथे पाहिला मिळतात, अशी माहिती व्यवसायिक अखिलेश भुतडा यांनी दिली आहे.





