ना चोरीचं टेन्शन ना महागाईची चिंता, फक्त 50 रुपयांपासून खरेदी करा आकर्षक दागिने, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Vrushabh Ramesrao Furkunde
Last Updated:
सध्याच्या काळात सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे महिला व मुलींचा कल आर्टिफिशियल दागिन्यांकडे वाढला आहे.
वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
नागपूर : दागिने हा महिलांचा सर्वात आवडीचा विषय असतो. त्यामुळे महिला विविध प्रकर आणि डिझाईनचे दागिने आवर्जून खरेदी करत असतात. सध्याच्या काळात सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे महिला व मुलींचा कल आर्टिफिशियल दागिन्यांकडे वाढला आहे. नागपूरमध्ये स्वस्तात मस्त आर्टिफिशियल दागिन्यांची क्रेझ आहे. अगदी 50 रुपयांपासून हे दागिने उपलब्ध आहेत.
advertisement
1 ग्रॅम दागिन्यांना मोठी मागणी
आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये 1 ग्रॅम सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी आहे. यामध्ये बांगड्या, कानातले, मंगळसूत्र आणि एकतारीसारख्या महाराष्ट्रीय दागिन्यांचा समावेश आहे. तसेच मोहनमाळ, हार आदींचीही आवर्जून खरेदी केली जाते. या दागिन्यांची किंमत 50 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन डायमंड आणि हाय गोल्ड ज्वेलरीही ट्रेंडमध्ये आहे. ब्रेसलेटची मागणीही जास्त आहे. त्याची किंमत 10 रुपयांपासून सुरू होते आणि 1,200 रुपयांपर्यंत जाते, असे व्यावसायिक नेहा माडवेकर यांनी सांगतात.
advertisement
भेटवस्तू म्हणून उत्तम पर्याय
आर्टिफिशियल ज्वेलरी भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही प्रकारच्या पोशाखांसाठी परिधान केली जाते. त्याचे ज्वेलरी सेटही सौंदर्यात भर घालतात. लग्न समारंभ असो की अन्य कोणताही प्रसंग त्यांची मागणी कायम आहे. भेटवस्तू देण्यासाठी देखील हा एक चांगला पर्याय आहे. तसेच ते अतिशय हलके आणि त्वचेला अनुकूल आहे. या सोबतच सुरक्षिततेबाबत ही चिंता नसते. कारण सोन्या पेक्षा खूप कमी किमतीत हे दागिने मिळतात. त्यामुळे चोरी होण्याची भीतीही सतावत नाही, असे प्रीती माडवेकर सांगतात.
advertisement
दरम्यान, सध्याच्या काळात आर्टिफिशियल ज्वेलरीला मोठी मागणी आहे. यामध्ये विविध डिझाईन आणि विविध प्रकारचे दागिने उपलब्ध असतात. त्यामुळे महिला आणि मुली असे दागिने आवर्जून खरेदी करून ठेवतात. तसेच प्रसंगानुसार ते वापरत असतात.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
May 16, 2024 6:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ना चोरीचं टेन्शन ना महागाईची चिंता, फक्त 50 रुपयांपासून खरेदी करा आकर्षक दागिने, Video

