पुणे : मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो. अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांत आली आहे. मकर संक्रांत म्हटलं की हलव्याचे दागिने हे खास आकर्षण असते. लग्नानंतर पहिली संक्रांत असेल तर मुलींसाठी, सुनेसाठी हमखास काळी साडी, हलव्याचे दागिने यांची खरेदी केली जाते. त्यामुळे बाजारातही आता हलव्याचे दागिने घेण्यासाठी महिलांची लगबग सुरु झालेली पाहायला मिळतेय. पुण्यातील रविवार पेठ या ठिकाणी स्वस्तात असे हे दागिने मिळतात.
advertisement
सणाच्या दिवशी महिला या हलव्याचे दागिने घालतात. पुण्यातील रविवार पेठ या ठिकाणी असलेलं बाबुराव एस. ठाकूर हे दुकान गेली 20 ते 25 वर्ष असून चार ते पाच प्रकारचे हलव्याचे वेगवेगळे प्रकारचे दागिने ते विकतात. यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सगळ्यांनसाठी हे दागिने असून होलसेलच्या किंमतीमध्ये हे हलव्याचे दागिने मिळतात.
जालन्यातील घेवर आणि फिनीची संपूर्ण राज्याला भुरळ, मकर संक्रातीमध्ये असते विशेष महत्त्व...
दागिन्यामध्ये मंगळसूत्र, कानातले, बाजूबंद, कंबर पट्टा, बांगड्या, बिंदी, हार असे सगळे हलव्याचे दागिने हे सध्या बाजारात असून ओववलेले पाहिला मिळतात. या दागिन्यासोबत वाण देण्याच्या इतर वस्तू देखील बाजारात उपलब्ध आहेत. 300 रुपयांपासून ते 800 रुपये पर्यंत हे सगळे दागिने सेट आहेत. तर लहान मुलांचे सेट हे फक्त 80 रुपयांपासून आहे. लहान मुलींचा परी सेट हा 200 रुपयाला आहे. वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये हे हलव्याचे दागिने पुण्यातील बाजार पेठेत मिळत असून नागरिकांची खरेदीसाठी आता गर्दी ही होत आहे, अशी माहिती व्यावसायिका सुनंदा ठाकूर यांनी दिली आहे.