मुंबई: सध्या खणाच्या साड्या, कुर्तीज आणि ओढण्या यांची खूप जास्त मागणी मार्केटमध्ये वाढताना दिसतेय. पण फक्त मोठ्यांकरताच नाहीतर लहान मुलींसाठीही खणाचे किंवा इरकलचे परकर पोलक्यासारख्या कपड्यांना तर प्रचंड पसंती आणि मागणी आहे. फोटोशूट असो किंवा पहिला वाढदिवस किंवा एखादा सण, आता लहान मुलींसाठीही खणाचे फ्रॉक आणि परकर पोलक्यालाच पहिली पसंती दिली जाते. मुंबईतील दादर मार्केटमधील अशाच एका स्टॉलवर लहान मुलींचे सुंदर खणाचे आणि इरकलमधले परकर पोलके पाहायला मिळतात. सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये तसेच वेगवेळ्या पॅटर्नमध्ये हे उपलब्ध आहेत.
advertisement
काय आहे किंमत?
दादर पश्चिम येथे आइडियल बुक सेंटरच्या लेनमध्ये कोटक महेंद्रा बॅंकच्या समोरच एक छोटासा स्टॉल आहे. या स्टॉलवर परकर पोलक्याचं सुंदर कलेक्शन पाहायला मिळतं. या स्टॉलवर सुंदर रंगसंगती असलेले हे खणाचे परकर पोलके नवजात बाळापासून ते 20 वर्षांच्या मुलींपर्यंत उपलब्ध आहेत. नवजात बाळांच्या परकर पोलक्याची किमंत 350 रुपये आहे. तर सहा महिन्याच्या मुलींच्या परकर पोलक्याची किंमत आणि 2 ते 4 वर्षांच्या मुलींच्या परकर पोलक्याची किंमत देखील 350 रुपयेच आहे. 5 ते 6 वर्षांच्या मुलींच्या परकर पोलक्याची किंमत 550 रुपये आहे.
आता आई-वडिलच म्हणतील हा गेम खेळा, 'मावळा' मिळवणार शिवकालीन मोहरा, Video
7 ते 8 वर्षांच्या मुलींच्या परकर पोलक्याची किंमत देखील 550 रुपयेच आहे. 9 ते 10 वर्षांच्या मुलींच्या परकर पोलक्याची किंमत सुरु होते 650 रुपयांपासून सुरु होते. परकर पोलक्यांमध्ये अनेक प्रकारचे पॅटर्न आणि सुंदर रंगसंगती पाहायला मिळते. प्रत्येक परकर पोलक्यामध्ये नवीन डिझाईन पाहायला मिळते. तसेच हातापासून ते गळ्यापर्यंतचे पॅटर्नही वेगळे आहे. नवजात बाळापासून ते 20 वर्षांच्या मुलींपर्यंतच्या ड्रेसमध्ये अजिबात सारखेपण दिसत नाही. प्रत्येक ड्रेसमध्ये वेगळी व्हरायटी पाहायला मिळेल.
वाह! इमारतीच्या गच्चीवर अवतरला निसर्ग; डोळ्यांना सुखावणारी हिरवाई, Video
परवडतील अशा दरात उपलब्ध
आमच्या स्टॉलवर नवजात बाळापासून ते 20 वर्षांच्या मुलींपर्यंत परकर पोलके मिळतात. प्रत्येक ड्रेसमध्ये काहीतरी नवीन पॅटर्न नक्कीच पाहायाला मिळेल. तसेच तुमच्या ऑर्डरप्रमाणेही परकर पोलके मिळतील. तेही अगदी परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत, असं येथील कपडे विक्रेत्याने सांगितलं.
मराठी मुलगी कशी झाली मोमोज गर्ल? स्वरांगी ठरतेय अनेकांसाठी प्रेरणा
तसं पाहता खरोखरच खण, इरकल स्टाईलचे कपडे, साड्या पुन्हा लाईम लाईटमध्ये आहेत. खणाच्या कपडापासून काही डिझायनर वेस्टर्न कपडे देखील आता पाहायला मिळतात. स्कर्ट, टॉप्स, ब्लेझर, वनपीस सारखे खणाचे ड्रेसेस लोक जास्त प्रमाणात वापरताना दिसून येतात. सणावाराला असे कपडे फार विकले जातात. खणाचे फ्रॉक, ड्रेस, परकर पोलके घातल्यावर खरोखरच पारंपारिक टच येतोच पण सोबत पारंपारिक पेहराव घातल्याचं समाधानही मिळतं.