हिंद एनएक्स हे एक होलसेल ज्वेलरी, कॉस्मेटिक, आणि ब्युटी पार्लरसाठी लागणाऱ्या बऱ्याच वस्तूंची विक्री करत असते. यांच्याकडून तुम्ही फक्त 5000 रुपयांचा माल घेऊन स्वतःचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकणार आहात. ज्यात तुम्हाला लेडीज क्लचर हे फक्त 2 रुपये तर 30 रुपयांपर्यंत मिळणार आहे. ज्यातून तुम्ही एक नग मागे कमीत कमी 15 ते 20 रुपये घेऊ शकता.
advertisement
Success Story: गृहिणी बनली उद्योजिका, लघु उद्योगानं पालटलं नशीब, प्रत्येकांनी वाचावी अशी कहाणी
तसेच यांच्याकडे लेडीज नेकलेस, मोती हार, लिपस्टिक, क्लचर, लहान मुलींचे डोक्याला लावता येणारे बेल्ट, हेअर कलर, मंगळसूत्र, आणखीन काही अशा बऱ्याच वस्तू या फक्त आणि फक्त 10 ते 50 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. ज्यातून तुम्ही जवळजवळ एक नग मागे 60 ते 150 रुपये कमाई करू शकणार आहात.
तसेच यांच्याकडे सर्व इमिटेशन ज्वेलरीबरोबर पार्लरसाठी लागणाऱ्या अशा ब्रँडेड कॉस्मेटिक वस्तू देखील आहेत. ज्यात तुम्ही 200 ते 350 रुपये असा प्रॉफिट घरबसल्या घेऊ शकणार आहात. यात ते फेस वॉश फक्त 99 रुपयाला देत असतात. ज्याची किंमत 250 रुपये आहे. तसेच स्क्रब, फेस मास्क, फेसपॅक, फेशियल किट, अशा बऱ्याच वस्तू त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
जे मुलं-मुली नोकरीच्या शोधात फिरत आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम अशी संधी आहे. हा व्यवसाय कसा करावा, माल कसा विकवा, तसेच त्यांच्या किंमती, कुठल्या वेळेस कुठला माल तुम्ही भरावा ज्याने तुम्हाला जास्त असा प्रॉफिट होईल याची देखील पूर्ण माहिती दुकान चालक हे देत असतात.
तर मित्रांनो, तुम्हाला देखील कमी खर्चात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर आजच नाशिकमधील हिंद एनएक्स या दुकानाला भेट द्या. नाशिकमधील शालिमार परिसरातील दही पूल जवळ असलेल्या राजधानी मॉलच्या मागे आहे . तसेच यांचे इंस्टा देखील आहे ज्यात तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात ऑर्डर मिळवू शकता.