डोंबिवली : वेगवेगळ्या प्रकारचे आणि डिझाईनचे टी-शर्ट घालायला सर्वांनाच आवडतात. डोंबिवलीमध्ये एका मराठी मुलाने प्रिंटिंग टी-शर्टचा व्यवसाय सुरू केला आहे. प्रिंट दादा असे या दुकानाचे नाव असून इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटिंग टी-शर्ट मिळतील. तुम्हाला हवा असणारा फोटो, लाईन्स तुम्ही या दुकानात येऊन प्रिंट करून घेऊ शकता.
डोंबिवली स्थानकापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या फडके रोडवर असणाऱ्या गणपती मंदिरच्या अगदी समोरच हे प्रिंट दादा दुकान आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला दोन वर्षाच्या मुलापासून ते 5 एक्सएल पर्यंत सगळे टी-शर्ट मिळतील. इथल्या एका प्रिंटेड टी-शर्टची किंमत फक्त चारशे रुपये आहे. कोणाला गिफ्ट करण्यासाठी किंवा पिकनिकला जाताना घालण्यासाठी हे टी-शर्ट एक बेस्ट ऑप्शन आहेत.
advertisement
होम डेकोरच्या सुंदर वस्तू, मुंबईतील परळमध्ये खरेदी करा 100 रुपयांपासून
कार्तिक दीपक अहिरे या मराठी तरुण मुलाने हा व्यवसाय सुरू केला. बारावी पास झाल्यानंतर आवड आहे म्हणून त्यांनी आठ वर्षांपूर्वी या व्यवसायाला सुरुवात केली. हळूहळू लोकांपर्यंत त्याचा हा व्यवसाय पोहोचला आणि आता वर्षाला त्या व्यवसायातून 13 ते 14 लाखांची उलाढाल करतो. मराठी माणसाने ठरवलं तर तो व्यवसायात काहीही करू शकतो हे यातून कळतं. कार्तिकच्या अनेक क्लायंट आवर्जून बाहेर फिरायला जाताना त्याला टी-शर्ट प्रिंटिंग साठी देतात. अनेक ढोल ताशा पथक सुद्धा कार्तिकच्या प्रिंटामध्ये एकसारखे टी-शर्ट किंवा कुर्ते प्रिंट करण्यासाठी येतात. या सगळ्यांचा त्याच्या कलेवर पूर्ण विश्वास आहे.
'मी गेले आठ वर्षे या व्यवसायात आहे. अनेक चढउतार आले परंतु मला आवड होती पूर्वीपासून आणि म्हणूनच मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकलो. माझं वैशिष्ट्य म्हणजे मार्केटमध्ये असणारे डिझाईन पेक्षा गिर्हाईकांना जे अपेक्षित आहे ते मी स्वतः डिझाईन करतो. आणि त्यांना त्या प्रकारे टी-शर्ट प्रिंट करून देतो. म्हणून डोंबिवलीकर आवर्जून माझ्याकडे टी-शर्ट प्रिंटिंग साठी येतात.' असे कार्तिक अहिरे यांनी सांगितले.
तुम्हालाही प्रिंटिंग असणारे मीम्स किंवा लाईन्स आपल्या टी-शर्ट वर छापून मस्त फोटोशूट करायचं असेल बाहेर फिरायला जायचं असेल तर नक्की प्रिंट दादाला भेट द्या आणि तुम्हाला हवे असणारे टी-शर्ट प्रिंट करून घ्या.





