होम डेकोरच्या सुंदर वस्तू, मुंबईतील परळमध्ये खरेदी करा 100 रुपयांपासून
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
इंडोअर प्लांट्स लावण्यासाठी सुद्धा कुंड्या सुंदर असाव्या लागतात. तुम्हालाही जर घराला शोभा आणतील असे कुंड्या, पॉट हवे असतील तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन घेऊन आलो आहोत.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : सध्या मुंबईमधील घरांसाठी काही उत्तम पर्याय असतील तर ते म्हणजे इंडोअर प्लांट्स. परंतु हे इंडोअर प्लांट्स लावण्यासाठी सुद्धा कुंड्या सुंदर असाव्या लागतात. तुम्हालाही जर घराला शोभा आणतील असे कुंड्या, पॉट हवे असतील तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन घेऊन आलो आहोत. परळ मधील हिरवळ या दुकानात सुंदर होम डेकोर प्रोडक्ट उपलब्ध झाले आहेत. याची खरेदी तुम्ही फक्त 100 रुपयांपासून करू शकता.
advertisement
अनुराधा नलावडे पवार या तरुणीने हा व्यवसाय पाच वर्षांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने सुरू केला. नुकत्याच दोन वर्षांपूर्वी तिने हा व्यवसाय परेल मध्ये स्टुडिओ खोलून नव्याने सुरू केला. मीडियाचे शिक्षण घेतलेले अनुराधाने शिक्षण झाल्यानंतर पाच ते सहा वर्ष नोकरी केली परंतु तिची गार्डनिंग मधली आवड तिला शांत बसू देत नव्हती आणि म्हणूनच तिने हिरवळ नावाने हे सुंदर शॉप सुरू केले. आपण एखाद्याला भेटवस्तू म्हणून सिरॅमिक कुंड्या किंवा इंडोअर प्लांट्स देऊ शकतो याच विचाराने तिने हा व्यवसाय सुरू केला.
advertisement
होम डेकोर प्रोडक्टमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या असून या सगळ्या मातीच्या आणि सिरॅमिकच्या कुंड्या आहेत. यावर सुंदर डिझाइन्स आणि डेकोरेशन केल्यामुळे आपोआपच ते आपलं लक्ष वेधून घेतात. एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी किंवा घर सजवण्यासाठी या सगळ्या कुंड्या एक बेस्ट ऑप्शन आहेत. यांची किंमत फक्त 100 रुपयांपासून इथे सुरू होते.
advertisement
या हिरवळमध्ये तुम्हाला झेन कॉर्नर कॉम्बो, आर्टिस्टिक पॉट रेंज, योगा लेडी कॉम्बो, प्रीमियम सिरामिक ट्रे पॉट, मोनोक्रोम कॉम्बो, प्रीमियम सिरॅमिक विथ वूड स्टॅन्ड पॉट, हमसा हँड, वस्तू प्लांट, लकी बांबू कॉम्बो, या सगळ्या प्रकारचे इंडोर प्लांट्स आणि वस्तू इथे उपलब्ध आहेत.
advertisement
'मीडियाचे शिक्षण जरी झालं असलं तरी आईला लहानपणापासूनच गार्डनिंग करताना पहात होते. त्यामुळे मलाही आपसुकच याची आवड लागली. यामध्ये सुद्धा करियर असतं हे मला सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं. सध्या मुंबईतील घरांना ग्रीन डेकोरची गरजच आहे. हेच लक्षात घेऊन मी या व्यवसायाला सुरुवात केली.' असे अनुराधा यांनी सांगितले.
हे हिरवळ परेल स्थानकापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या उमरगाव बिल्डिंग येथे आहे. तुम्ही इथे जाऊन सुंदर सुंदर आणि वरायटीमध्ये या होम डेकोरच्या वस्तू खरेदी करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 12, 2024 9:08 PM IST








