उबदार कपड्यांना येणारी दुर्गंधी कशी दूर कराल? या सोप्या घरगुती ट्रिक्स आजमवा अन् कपड्यांना येणारा वास दूर पळवा

Last Updated:

थंडीच्या कपड्यांमधील दुर्गंध हा एक सामान्य प्रश्न आहे, पण बेकिंग सोडा, व्हिनेगर, ओलावा नियंत्रित ठेवणे आणि एअर फ्रेशनरच्या साध्या उपायांनी तो सहज दूर करता येतो. या टिप्स वापरून तुमच्या थंडीतील कपड्यांचा वास येणार नाही. 

News18
News18
थंडीच्या दिवसांत कपाटातून थंडीत वापरात येणारी कपडे काढताना त्यांना एक विचित्र वास येत असतो. हा वास ओलावा, धूळ आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे येतो. कपडे खूप दिवस वापरले नसल्यानेही हा वास येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत ज्यामुळे ही दुर्गंधी दूर करता येईल.
बेकिंग सोडाचा वापर : कपड्यांमधील दुर्गंध दूर करण्यासाठी बेकिंग सोडा उत्तम उपाय आहे. कपड्यांमध्ये बेकिंग सोडा शिंपडा आणि काही तासांसाठी तसेच ठेवा. बेकिंग सोडा वास शोषून घेतो आणि कपड्यांना व्यवस्थित राहतात.
व्हिनेगरचा वापर : व्हिनेगरचा वापर कपड्यांचा वास घालवण्यासोबतच त्यांना शुद्ध देखील करतो. थोडासा व्हिनेगर कोमट पाण्यात घालून कपडे धुतल्यास वास नाहीसा होतो. विशेषतः कमी धुण्याची गरज असणाऱ्या कपड्यांमध्ये व्हिनेगरचा वापर उपयुक्त ठरतो.
advertisement
ओलावा नियंत्रित ठेवा : कपाटातील कपड्यांना येणाऱ्या वासाचे मुख्य कारण ओलावा असू शकतो. ओलावा नियंत्रित करण्यासाठी कपाटात सिलिका जेल किंवा कडूलिंबाची पाने ठेवा. हे ओलावा शोषून घेतात आणि कपडे कोरडे राहतात, ज्यामुळे वास दूर होतो.
advertisement
फ्रेश एअर फ्रेशनरचा वापर करा : कपड्यांमधील दुर्गंध घालवण्यासाठी फ्रेश एअर फ्रेशनर वापरता येईल. कपाटात किंवा कपड्यांवर हलका नैसर्गिक एअर फ्रेशनर स्प्रे करा. यामुळे दुर्गंध दूर होईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
उबदार कपड्यांना येणारी दुर्गंधी कशी दूर कराल? या सोप्या घरगुती ट्रिक्स आजमवा अन् कपड्यांना येणारा वास दूर पळवा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement