केस गळण्यामागचं कारण आणि खनिजाची कमतरता याबद्दल प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत डॉक्टरांनी या खास खनिजाबद्दल विस्तारानं सांगितलं आहे.
Kishmish : दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या मनुकांचं पाणी, आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होतील दूर
शरीरात झिंकची कमतरता असते तेव्हा केस अचानक पातळ होतात. झिंक म्हणजेच जस्त हे आपल्या शरीरातील एक आवश्यक खनिज आहे. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि नवीन केस वाढण्यास मदत होते. याशिवाय, झिंक केसांच्या वाढीच्या संप्रेरकावर नियंत्रण ठेवते. शरीरात त्याची कमतरता असेल तर केस कमकुवत होतात आणि गळू लागतात.
advertisement
डॉ. बर्ग यांच्या संशोधनानुसार, सुमारे तीस टक्के नागरिकांमधे झिंकची कमतरता आढळते. ही कमतरता बराच काळ असेल तर डोक्यावर टक्कल पडू लागतं.
झिंकच्या कमतरतेचं कारण - आजच्या काळात जास्त प्रक्रिया केलेलं अन्न आणि जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ खातात. अतिरिक्त कर्बोदकांमुळे शरीरात झिंक योग्यरित्या शोषलं जात नाही, ज्यामुळे हळूहळू त्याची कमतरता निर्माण होते.
Ear Phones : इअर फोनचा अतिवापर धोकादायक, कानासह हृदयाला पोहचते हानी
झिंक वाढवण्याचे सोपे मार्ग -
- प्रक्रिया केलेलं अन्न आणि जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ टाळा.
- पांढरा ब्रेड, मिठाई आणि पॅकेज्ड फूडचं प्रमाण कमी करा.
- आहारात झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करा. भोपळ्याच्या बिया, बदाम आणि काजू, अंडी, मासे आणि सीफूड, पालक, डाळी आणि हरभरा खाण्यावर भर द्या.
- केस गळती जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर झिंक सप्लिमेंट्स घेता येतील.
झिंक केवळ केसांसाठीच नाही तर एकूण आरोग्यासाठी देखील महत्त्वाचं आहे. केस गळणं थांबवायचं असेल तर आजपासूनच आहारात झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करा. योग्य आहार आणि जीवनशैलीनं केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात.