साताऱ्यातील कराड नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असलेली जनशक्ती विकास आघाडीच्या माजी दोन नगराध्यक्ष आणि सात नगरसेवकांनी आपल्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद वाढली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा एक धक्का मानला जात आहे.
advertisement
भारतीय जनता पक्षात कोणी कोणी प्रवेश केला?
- अरुण जाधव
- शारदाताई जाधव (पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा २००१ ते २००६, दुसऱ्यांदा नगराध्यक्षा २००९ ते २०११ ,
- अशोक भोसले ( माजी नगराध्यक्ष १९९८ ते ९९, कराड नगपरिषद नगरसेवक १९९६ ते २००६
- अतुल शिंदे (उपाध्यक्ष, जनशक्ती आघाडी माजी नगरसेवक, कराड नगपरिषद
- आशुतोष जयवंतराव जाधव (युवा नेते व माजी नगराध्यक्ष जयवंतराव जाधव यांचे चिरंजीव)
- आनंदराव पालकर, माजी नगरसेवक
- शिवाजीराव पवार, माजी नगरसेवक
- चंदाराणी लुणीया, माजी नगरसेविका
- विनायक विभुते, माजी नगरसेवक
- अरुणा शिंदे, माजी नगरसेविका
अध्यक्ष, जनशक्ती आघाडी व माजी नगरसेवक आणि कराड उत्तर विधानसभेचे 2004 चे अपक्ष उमेदवार
१९८५ पासून आजअखेर नगरसेवक, सन २०१६ ला बिनविरोध नगरसेविका)
भाजपचं बळ आणखी वाढलं
दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर आता राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. भाजपाची नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बेरीज असल्याचे देखील म्हटले जात आहे. सातारा नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. साताऱ्यात भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. अशातच या पक्षप्रवेशामुळे भाजपचं बळ आणखी वाढलं आहे.
