नगरमध्ये शरद पवारांना धक्का बसणार, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ST राखीव झाल्याने युवा नेता विखेंच्या भेटीला

Last Updated:

ZP Election : दिवाळीचा सण सरताच राज्यात जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

अमित भांगरे-राधाकृष्ण विखे पाटील
अमित भांगरे-राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर : राज्यातील विविध जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकीय समीकरणे पूर्णत: बदलून गेली आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आरक्षण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने संभाव्य गणिते लक्षात घेऊन इच्छुकांनी भेटीगाठींना सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, अकोल्याचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले अमित भांगरे यांनी पाडव्यादिवशीच भाजपचे बडे नेते, अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन राजकीय विषयावर चर्चा केली.
दिवाळीचा सण सरताच राज्यात जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होऊ शकते, असे जाणकार सांगतात. त्यामुळे संभाव्य गणिते लक्षात घेऊन इच्छुक नेतेमंडळींनी आतापासूनच तयारी सुरुवात केली आहे.

ST अध्यक्षपद राखीव झाल्याने जिल्ह्यात हालचालींना वेग

अनुसूचित जातीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव झाल्याने जिल्ह्यात हालचालींना वेग आलेला आहे. शरद पवार यांचे अकोले येथील खंदे समर्थक अमित भांगरे यांनी राधाकृष्ण विखे यांची भेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या सुनीता भांगरे आणि भाजपचे माजी आमदार वैभव पिचड होते. शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात ही भेट झाली.
advertisement

...तर तो शरद पवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का

विखे पाटलांच्या भेटीमुळे अमित भांगरे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. राष्ट्रवादीची दोन शकले पडल्याने आणि काँग्रेस-शिवसेनेचा फारसा बोलबाला नसल्याने जिल्ह्यात भाजपला चांगल्याच कामगिरीची आशा आहे. तसेच जिल्ह्यात भाजपची ताकदही चांगलीच वाढलेली आहे. त्यामुळे आगामी राजकीय संधीचा विचार करून भांगरे यांनी विखे पाटील यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. जर अमित भांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर तो शरद पवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का असेल.
view comments
मराठी बातम्या/Local Body Elections/
नगरमध्ये शरद पवारांना धक्का बसणार, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ST राखीव झाल्याने युवा नेता विखेंच्या भेटीला
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement