याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेरिटाईम बोर्डाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. कोची मेट्रो रेलची एकमेव निविदा आली झाली आहे. त्यांनी डीपीआर सादर केल्यानंतर 10 नव्या मार्गांवर स्पीडबोटी, रो-रो सेवा आणि वॉटर टॅक्सी धावताना दिसणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चार नव्या जलमार्गांनी जोडलं जाणार आहे.
advertisement
सध्या 12 मार्गावर जलवाहतूक सुरू असल्याचं सांगितलं जातं. मात्र, यापैकी न्यू फेरी वॉर्फ-मोरा, न्यू फेरी वॉर्फ-रेवस आणि बेलापूर-नेरूळ मार्ग कागदावरच आहेत. अर्नाळा ते अर्नाळा किल्ला, वसई-भाईंदर, वर्सोवा-मढ, गोराई-बोरीवली, बोरीवली-एसेल वर्ल्ड, मार्वे-मनोरी, गेटवे ऑफ इंडिया-मांडवा, गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा या मार्गांत सुधारणा केली जाणार आहे.
नवीन जल मार्गांमुळे, मुंबई-नवी मुंबईसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर वसई आणि नजीकच्या उरणसारख्या बंदरांवरही चाकरमान्यांना कॅटमरान, स्पीड बोटींसह रो-रो पॅक्सने ये-जा करता येणार आहे. सध्या भाऊचा धक्का ते रेवस, करंजा, मोरा, धरमतर मार्गावर प्रवासी जलवाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवासाचं अंतर कमी होऊन इंधनासह वेळेचीही बचत होईल. शिवाय प्रदूषण आणि अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
प्रस्तावित नवीन 10 जलमार्ग
- वसई ते काल्हेर हा मार्ग वसई-मीरा भाईंदर फाउंटेन जंक्शन, गायमुख, नागला बंदर, काल्हेरपर्यंत जाणार
- कल्याण ते कोलशेत मार्गे कल्याण-मुंब्रा-काल्हेर-कोलशेत जोडले जाणार.
- काल्हेर ते नवी मुंबई विमानतळ मार्गावर काल्हेर-मुलुंड-ऐरोली- वाशी- नवी मुंबई विमानतळ ही ठिकाणं असतील.
- वाशी ते नवी मुंबई विमानतळ
- बेलापूर ते नवी मुंबई विमानतळ
- गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ
- गेट वे ऑफ इंडिया ते वाशी
- वसई ते मार्वे
- बोरीवली ते बांद्रा मार्ग बोरीवली-मार्वे-वर्सोवा-बांद्रा
- बांद्रा ते नरिमन पॉईंट मार्ग हा बांद्रा-वरळी-नरिमन पॉईंट