मिळालेल्या माहितीनुसार, लासलगावच्या टाकळी विंचूर इथं ही घटना समोर आली आहे. कल्याणी मोकाटे ( वय 28) असं मृत तरुणीचं नाव आहे. कल्याणी रात्री नेहमीप्रमाणे तीच्या रूममध्ये झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ होऊन देखील कल्याणी उठली नाही. त्यामुळे घरच्या मंडळींनी तीला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती उठत नसल्याने सगळ्यांना चिंता वाटली. कल्याणी कुठलीही हालचाल करत नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांच्या मनातपाल चुकचुकली. कल्याणीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केलं. कल्याणीचा मृत्यू झाल्याचं सांगताच सर्वांना मोठा धक्का बसला.
advertisement
झोपेत आले ३ हार्ट अटॅक
कल्याणी मोकाटे ही आपल्या पालकांसोबत टाकळी विंचूर या गावात राहत होती. कल्याणही उच्चशिक्षित होती. अविवाहित होती. जेव्हा तिचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा धक्कादायक अहवाल समोर आला. शवविच्छेदन अहवालामध्ये कल्याणीला झोपेत एका पाठोपाठ एक असे ३ हृदयविकाराचे धक्के आले होते. ह्रदयविकाराचे ध्के बसल्यामुळे तीचा मृत्यू झाला आहे. २८ वर्षांच्या तरुणीचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या घरामध्ये ह्रदयविकाराचे कुणीही रुग्ण नाही. पण तरीही कल्याणीचा ह्रदयविकाराच्या धक्काने मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.