TRENDING:

‎Ram Rangoli: 56 तासांच्या अथक प्रयत्नांतून अवतरले श्रीराम, छ. संभाजीनगरमधील रांगोळी ठरतेय आकर्षण, VIDEO

Last Updated:

Ram Rangoli: रांगोळी हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सणसमारंभांमध्ये घरासमोर रांगोळी काढली जाते, जेणेकरून घरात लक्ष्मीचा वास राहावा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : सध्या घरोघरी गौरी-गणपतीची लगबग आहे. गणरायापाठोपाठ 31 ऑगस्ट रोजी गौरींचं देखील आगमन झालं आहे. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी देखील म्हटलं जातं. छत्रपती संभाजीनगर शहरात देखील अनेक घरी महालक्ष्मी विराजमान झाल्या आहेत. घरातील महिलावर्ग महालक्ष्मींची सेवा करण्यात आणि सजावट करण्यात व्यग्र आहेत. आपल्या घरच्या महालक्ष्मी अधिक आकर्षक दिसाव्यात यासाठी महिलांची धडपड सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील अर्चना शिंदे यांची देखील अशीच इच्छा होती. अर्चना यांनी घरातील महालक्ष्मी समोर रांगोळीच्या माध्यमातून रामाची प्रतिकृती साकारली आहे.
advertisement

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागात राहणाऱ्या अर्चना शिंदे यांनी रांगोळीतून साकारलेली रामाची प्रतिकृती जिल्ह्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. अर्चना यांनी 56 तासांच्या अथक प्रयत्नातून ही रामाची प्रतिकृती साकारली आहे. अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेलं आयोध्येतील राम मंदिर तयार झालं आहे. त्यामुळे अर्चना यांनी रांगोळीसाठी रामाची थीम निवडली. रोम येथील 'इन्ले आर्ट'पासून (Inlay Art) प्रेरणा घेऊन अर्चना यांनी ही प्रतिकृती साकारली आहे. इन्ले आर्ट 1600 मध्ये मोगलांनी भारतात आणलं. ताजमहालाच्या बांधकामात देखील हीच शैली वापरलेली आहे.

advertisement

Ganeshotsav 2025: चक्क साबुदाण्यापासून तयार केला बाप्पा, छ. संभाजीनगरमधील 14 फुटांची मूर्ती ठरतेय आकर्षण, VIDEO

आपल्या कलाकृतीबद्दल बोलताना अर्चना म्हणाल्या, "‎मी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीची रांगोळी काढत असते. यावर्षी मला एकदम अद्वितीय रांगोळी काढायची होती. म्हणून मी राम मंदिरातील रामाच्या मूर्तीची प्रतिकृती काढण्याचा प्रयत्न केला. मी 12-12 तास बसून ही रांगोळी काढली आहे. एक दिवस तर सलग 15 तास बसले होते. माझ्या प्रयत्नांना अतिशय सुंदर रूप मिळाल्याने मी समाधानी आहे."

advertisement

रांगोळी हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सणसमारंभांमध्ये घरासमोर रांगोळी काढली जाते, जेणेकरून घरात लक्ष्मीचा वास राहावा. रांगोळी काढण्यासाठी तांदळाचं पीठ, रंगीत पावडर किंवा फुलांच्या पाकळ्या वापरल्या जातात. वाईट शक्तींना दूर ठेवणे आणि पाहुण्यांचं स्वागत करणे, हा रांगोळी काढण्यामागे मुख्य हेतू असतो. अर्चना शिंदे यांनी देखील आपल्या रांगोळीच्या माध्यमातून महालक्ष्मींचं स्वागत तर केलंच शिवाय येणाऱ्या पाहुण्यांचंही स्वागत केलं.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
‎Ram Rangoli: 56 तासांच्या अथक प्रयत्नांतून अवतरले श्रीराम, छ. संभाजीनगरमधील रांगोळी ठरतेय आकर्षण, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल