आयसीटीकॉर्नर अंतर्गत पहिला उपक्रम 'Talking With Alexa'
पी. एम. श्री उच्च प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षक अंकुश गावंडे यांनी लोकल18 शी संवाद साधला. ते म्हणाले, "मी वर्ग खोलीमध्ये आयसीटी कॉर्नर तयार केला आहे. त्या अंतर्गत मी विविध उपक्रम राबवत असतो. त्यातील सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे 'Talking With Alexa'. मी अॅलेक्सा हे गॅझेट आणून त्याला एक डॉल अॅटॅच केली. विद्यार्थी दररोज 10 प्रश्न काढून आणतात आणि अॅलेक्साला ते प्रश्न विचारतात. यामुळे मुलांची इंग्रजी बोलण्याची शैली सुधारली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे."
advertisement
Ganesh Chaturthi: आदिवासी मुलांच्या हातून बाप्पा घेतोय आकार, 'गुरुकुल' गणपतीला ग्राहकांची पसंती
आयसीटीकॉर्नर अंतर्गत दुसरा उपक्रम 'ए. आर आणि व्ही. आर.'
या उपक्रमात विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल रिअॅलिटीसारखी संकल्पना शिकवली जाते. ए. आरमध्ये विद्यार्थी एखाद्या विशिष्ट अॅपद्वारे चित्र स्कॅन करून माहिती मिळवतात. तसेच व्ही. आरच्या माध्यमातून म्युझियम, सूर्यमालेसारख्या गोष्टी अनुभवण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी पैसे खर्च करून मोठमोठ्या शहरात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी अशी गॅजेट्स खूप महत्वाची ठरत आहेत.
वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट
या उपक्रमाच्या माध्यमातून विविध देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो आणि माहितीची देवाणघेवाण केली जाते. याबाबत बोलताना अंकुश गावंडे म्हणाले, "एज्युकेशन कल्चर एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत माझ्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे विचारांची आणि अभ्यासक्रमाची देवाणघेवाण होते. शिवाय विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. शाळेतील संपूर्ण स्टाफ मला या कामात मदत करतो. माझ्या या उपक्रमांची दखल शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी यांनी सुद्धा घेतली आहे."