महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकीचा महासंग्राम सुरू आहे. राज्यातील ठाकरे बंधूंची पहिली सभा नाशिकमध्ये झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा नाशकात होत आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठी गर्दी होती. अशात राज ठाकरे यांचे भाषण उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काका राज यांचे भाषण प्रवासात ऐकले. राज ठाकरे यांचे भाषण सुरू असताना आदित्य ठाकरे प्रवासात होते आणि त्यांनी गाडीतच भाषण ऐकले.
advertisement
नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची आज ऐतिहासिक सभा पाहायला मिळाली. यावेळी राज्यात सुरू असलेली विचित्र युत्यांचा राज ठाकरेंनी ठाकरे शैलीत समाचार घेतला आहे. कॅरेम इतका फुटला आहे. कुणाच्या कवड्या कोणत्या भोXX जात आहे, कळत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी सुनावले.
