तापमान ५ अंश सेल्सिअसने खाली
मागील २४ तासांच्या नोंदीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोवा या भागांमध्ये किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा सुमारे ५ अंश सेल्सिअसने खाली आले आहे. यामुळे येथील नागरिकांना अचानक थंडीचा मोठा अनुभव येत आहे. यासोबतच, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्येही आज थंडीचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांना सकाळच्या वेळी जास्त थंडीचा सामना करावा लागत आहे.
advertisement
पुढील ४ दिवसांत दिलासा मिळण्याची शक्यता
सध्याची ही शीत लहरीची स्थिती पुढील २४ तास कायम राहील. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, त्यानंतर लगेचच पुढील चार दिवसांत राज्यात तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीच्या कडाक्यातून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशाच्या दक्षिण भागात मात्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आजही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
फक्त मध्य महाराष्ट्रच नव्हे, तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्येही आज एका-दोन ठिकाणी शीत लहरींचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे. उद्या मध्य महाराष्ट्रात शीत लहरींची स्थिती कायम राहील, यासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मात्र, पुढील २४ तासांनंतर तापमान स्थिर राहील आणि त्यानंतरच्या चार दिवसांत तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता असल्याने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
एकीकडे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढलेला असताना, दक्षिण भारतात मात्र वेगळेच चित्र आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तमिळनाडूमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडूमध्ये १९ ते २४ नोव्हेंबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे वादळी वाऱ्यासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटसह अति मुसळधार पाऊस होणार आहे. समुद्र खवळल्याने मासेमारी कऱण्यासाठी न जाण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात तूर्तास पावसाचा कोणताही इशारा देण्यात आला नाही.
