TRENDING:

Krushi Market: मक्याचे दर गडगडले, सोयाबीनच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याची आज काय स्थिती? Video

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मंगळवार, दिनांक 18 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा आणि मक्याची आवक आणि भाव पाहू.
advertisement

मक्याचे दर गडगडले 

राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 44 हजार 058 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 8 हजार 364 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1175 ते जास्तीत जास्त 1516 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 823 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

advertisement

Weather Alert : महाराष्ट्रात बुधवारी लाट येणार, हवामान खात्याचा 2 जिल्ह्यांना अलर्ट

कांद्याची उच्चांकी आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख, 87 हजार 034 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख, 08 हजार 356 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 333 ते 1854 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 470 क्विंटल कांद्यास 1400 ते 3500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

advertisement

सोयाबीनची आवक स्थिर 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

राज्याच्या मार्केटमध्ये 71 हजार, 657 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 25 हजार 054 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3998 ते 4580 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच अकोला मार्केटमध्ये आवक झालेल्या 6 हजार, 225 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 5000 प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market: मक्याचे दर गडगडले, सोयाबीनच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याची आज काय स्थिती? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल