महाराष्ट्रात कसं राहील हवामान
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. पुढील २४ तासांत राज्याच्या किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. मात्र, त्यानंतरच्या पुढील ४ दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, पुढील काही दिवस थंडीचा कडाका काहीसा ओसरणार असून रात्रीचा गारवा कमी होईल.
advertisement
तापमानात वाढ होणार
महाराष्ट्रतील किमान तापमानात 3-4 अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण राहील. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम संपला आहे. पहाटे आणि रात्री गारठा वाटत असला तरीसुद्ध दिवसा कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. धुळे, निफाड, नांदेड या ठिकाणी अजूनही किमान तापमान 8 ते 9 अंशांवरच आहे. कोकणात मात्र थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे.
दक्षिणेकडून येतात खारे वारे
दक्षिणेकडे तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावर सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तूर्तास तरी मुसळधार पावसाचा अंदाज महाराष्ट्रात कुठेही नाही. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे. मात्र काही ठिकाणी कमाल तापमान 35 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या थंडीचा जोर काहीसा कमी झाला असला तरी येत्या आठवड्याच्या शेवटी पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. २० जानेवारीनंतर सक्रिय होणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे २१ ते २६ जानेवारीदरम्यान शीतलहरींचा प्रभाव जाणवणार आहे. २३ ते २६ जानेवारीदरम्यान धुके व गारठा वाढेल, तर किमान तापमान १० अंशांखाली जाण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. दिवस मात्र उबदार राहणार असून प्रजासत्ताक दिनाच्या सुमारास थंडीची मोठी लाट येण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रावर पुन्हा संकट
राज्यात धुळे, गोंदिया आणि निफाड सर्वात थंड शहरं ठरली आहे. पुढचे 24 तास या भागांमध्ये गारठा कायम राहणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत थंडी गायब होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर उकाडा वाढू शकतो. रात्री थंडी दिवसाा उकाडा अशी दुहेरी स्थिती असल्याने पिकांना आणि नागरिकांना याचा त्रास जाणवत आहे.
